agriculture news in marathi, onion carry Vehicles return from borders, nashik, maharashtra | Page 3 ||| Agrowon

भारतीय सीमांवरून कांद्याचे ट्रक माघारी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नाशिक : निर्यातबंदीपूर्वी पाठवण्यात आलेले कांद्याचे ट्रक भारतीय सीमांवरून माघारी येत आहेत. त्यामुळे कांदा निर्यातीतील व्यवहार अडचणीत अाले असून, कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता निर्यातदार व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

नाशिक : निर्यातबंदीपूर्वी पाठवण्यात आलेले कांद्याचे ट्रक भारतीय सीमांवरून माघारी येत आहेत. त्यामुळे कांदा निर्यातीतील व्यवहार अडचणीत अाले असून, कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता निर्यातदार व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

शेतकऱ्यांकडे साठवलेला कांदा संपुष्टात येत असल्याने तसेच मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने दरात सुधारणा झाली होती. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक कांदा व्यापाऱ्यांना बाहेरील देशांना व्यवहाराप्रमाणे कांदा पाठवता येत नसल्याचे चित्र आहे. कांदा निर्यातबंदीपूर्वी नेपाळ, बांगलादेश सीमेवर गेलेले कांद्याचे ट्रक माघारी पाठविण्यात आले असल्याची माहिती नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी दिली. मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांद्याची दरवाढ होत आहे, असे कारण देत वाणिज्य मंत्रालयाने निर्यातबंदीचे पाऊल उचलले आहे.  

हे जरी खरे असले तरी, रविवारपूर्वी अनेक कांदा निर्यातदारांनी शेजारील देशांकडून आगाऊ ऑर्डर घेतल्या होत्या. त्या रविवारी सीमेवर पोचल्या होत्या. मात्र निर्यातबंदीच्या निर्णयामुळे सीमेच्या पुढे कांदा पाठविण्यास सरकारने मनाई केली आहे. त्यामुळे सीमेवर येऊनही कांदा देशाबाहेर जाऊ शकला नसल्याने मोठे नुकसान होत आहे. याचा फटका कांदा व्यापाऱ्यांना बसला आहे. अनेक कांदा व्यापाऱ्यांनी आगाऊ रक्कम घेऊन संबंधितांना कांदा पाठवला होता. मात्र तो जाऊ न शकल्याने व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. समोरील आयातदाराला पैसे परत देताना कांदा भावाच्या घसरणीमुळे परत पैसे कसे द्यायचे या चिंतेत व्यापारी आहेत. स्टॉक लिमिट काढावी, आयातदारांनी नोंदवलेली २९ तारखेपूर्वीची ऑर्डर पूर्ण करू द्यावी. लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापारी करत आहेत. 

कांद्याचे ट्रक थांबून
मेहंदीपूर, भोजा दंगा, हिली बनगाव या सीमांवर ३०० कांद्याचे ट्रक थांबून होते. नेपाळ सीमेवर सिनौली व दुसऱ्या सीमेवर ५० ट्रक होते. मुंबईमध्ये १०० ट्रक थांबून असल्याची शक्यता आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका कांदा निर्यातीच्या निर्णयामुळे बसणार आहे.
 
व्यापाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
नाशिक जिल्ह्यात कांद्याचा लिलाव खुल्या पद्धतीने होतो, त्यामुळे माळ घेतल्यानंतर ती पुढे पाठविताना २ ते ७ दिवस लागतात. कांदा व्यापाऱ्यांना ५०० क्विंटल साठवणुकीची मर्यादा असल्याने खरेदी थांबत आहे. त्या दृष्टीने कांदा खरेदी केल्यानंतर त्याची पुढील विल्हेवाट करण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी मिळावा. आम्ही दैनंदिन बाजार समितीच्या माध्यमातून आवक, खरेदी व विक्री रिपोर्ट सादर करत आहोत. त्यामुळे मागणी लक्षात घेता कांदा लोडिंगसाठी अधिक वेळ द्यावा, अशी मागणी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे.


इतर अॅग्रो विशेष
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...
उष्णतेच्या लाटेने पिके होरपळलीपुणे : राज्यात मराठवाडा, विदर्भासह खानदेशात...