agriculture news in marathi, Onion cluster in Nashik, Maharashtra | Agrowon

नाशिकला होणार कांदा क्लस्टर

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

नाशिकच्या कांद्याला नुकताच जी आय टॅग मिळाला आहे. देशाच्या निर्यातीमध्ये नाशिकच्या कांद्याचा सर्वाधिक वाटा आहे. नाशिकमध्ये कांद्याचे क्लस्टर होणार असल्याने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. यामुळे मागणी वाढल्यास व्हरायटीही येऊ शकेल. हे क्लस्टर नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीची भेटच आहे.
- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड

नाशिक : कांदा, बटाटा आणि टोमॅटो या तीन पिकांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात कांद्याचे क्लस्टर साकारले जाणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना त्याद्वारे प्रत्यक्ष लाभ मिळेल, अशी माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली. 

कांदा, बटाटा आणि टोमॅटो या तिन्ही पिकांचे दर नेहमीच कमी-अधिक होत असल्याने त्याचा परिणाम ग्राहक आणि शेतकरी या दोन्ही घटकांवर होतो. त्यामुळेच हा विषय राष्ट्रीय राजकारणाच्‍याही अलीकडे महत्त्वाचा भाग बनला आहे. हीच बाब ओळखून केंद्रीय कृषी प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ''ऑपरेशन ग्रीन'' योजना हाती घेतली आहे. त्याद्वारे चांगल्या दर्जाच्या पिकांची लागवड, उत्पादन, उत्तम साखळी, साठवणुकीसाठी चांगले पर्याय आणि देशभरातील दरांवर नियंत्रण हे सारे करणे शक्य होणार आहे. 

कांद्यासाठी नाशिक, कर्नाटकच्या गदग आणि धारवाड, गुजरातच्या भावनगर आणि बिहारच्या नालंदा येथे क्लस्टर विकसित केले जाणार आहेत. क्लस्टरसाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. सहकारी संस्था, शेतकऱ्यांचे गट, शेतकरी संघटना यापैकी कुणीही या क्लस्टरसाठी अर्ज करू शकणार आहे. वितरण व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच या पिकांवर आधारित उद्योगांनाही चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सात राज्यांत टोमॅटोसाठी क्लस्टर 
टोमॅटोसाठी चित्तूर आणि अनंतपूर (आंध्र प्रदेश), कोलार आणि छिक्कबल्लापूर (कर्नाटक), मयूरभंज आणि किओन्झर (ओरिसा) आणि साबरकांथा (गुजरात) येथे तसेच बटाट्यासाठी आग्रा, फिरोझाबाद, हथरस, अलिगढ, फारुखाबाद, कन्नौज (उत्तर प्रदेश), हुगळी आणि पूर्व वर्धमान (पश्चिम बंगाल), नालंदा (बिहार) येथे क्लस्टर विकसित केले जाणार आहे.


इतर अॅग्रो विशेष
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...
दराबाबतचा दुटप्पीपणा घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर...
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...