Agriculture news in marathi Onion Conference of Farmers' Union to be held at Chandwad : ghanwat | Agrowon

चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद होणार : घनवट

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी कांदा निर्यातबंदी उठविण्याची घोषणा केली असली, तरी ती कायमस्वरूपी नाही. कांद्यावरील इतर निर्बंध कायमचे हटवून कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप थांबवा, ही शेतकरी संघटनेची भूमिका आहे. त्यासाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित चांदवड येथे १ मार्च रोजी कांदा परिषद होणारच अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी कांदा निर्यातबंदी उठविण्याची घोषणा केली असली, तरी ती कायमस्वरूपी नाही. कांद्यावरील इतर निर्बंध कायमचे हटवून कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप थांबवा, ही शेतकरी संघटनेची भूमिका आहे. त्यासाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित चांदवड येथे १ मार्च रोजी कांदा परिषद होणारच अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद केली, साठवणूक मर्यादा व परदेशातून कांद्याची आयात ही केली आहे. आता कांद्याचे नवीन पीक बाजारात आले आहे, त्यामुळे कांद्याचे भाव कोसळत आहेत. या पार्श्वभूमीवर कांद्याची निर्यात खुली करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. निर्यातबंदी हटविण्याची घोषणा झाल्यामुळे कांदा दरातील घसरण सध्या थांबणार आहे. परंतु ही निर्यातबंदी किती काळापुरती आहे. किती टन मर्यादेपर्यंत आहे, कोणत्या वाणाच्या कांद्यासाठी आहे, निर्यात शुल्क किती आकारले जाणार, साठ्यांवरील बंधनाचे काय? या बाबी स्पष्ट नाहीत. या मुद्द्यांवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १ मार्च रोजी चांदवड येथे कांदा परिषद आयोजित केली असल्याची माहिती श्री. घनवट यांनी दिली. 

चांदवड येथे होणाऱ्या या कांदा परिषदेत कांदा पीक, व्यापार, साठवणूक, निर्यात व शासनाचे धोरण या विषयावर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख कुबेर जाधव, पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या अध्यक्षा सीमाताई नरोडे आदी या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्या अध्यक्षतेखाली कांदा परिषद होणार आहे.

सध्या जगभरात कांद्याचे बाजार चढे आहेत, कांद्याची मागणी आहे; परंतु निर्यातबंदी असल्यामुळे ही संधी हातची जात आहे. कांद्याच्या भावाचा परिणाम फक्त शेतकऱ्यांवरच नाही तर कांदा उत्पादक परिसरातील व्यावसायिकांवर होतो याचा विचार करून सर्वांनी परिषदेत उपस्थित राहून मते मांडावीत व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देविदास पवार, नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बोराडे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर पुरकर, चांदवड तालुका अध्यक्ष अनंत सादडे, त्रिंबक गांगुर्डे यांनी केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ,...
गरजूंसाठी या बळीराजाने खुली केली...नाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर...
मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढमुंबई  : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता...
अंकुशनगर परिसरात पावसाचा दणका अंकूशनगर, जि. जालना: एकिकडे कोरोनाचे सावट...
परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची पूर्ण...मुंबई : जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची कमी नाही,...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...
नांदेड येथे वाहतूक प्रमाणपत्र कक्ष...नांदेड ः अत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा...
सांगली, मिरज, कुपवाड शहरात घरपोच...सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड...
नगर जिल्ह्यात लाख मोलाची फुले होताहेत...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परराज्यातील...