कांदा पिकाला खानदेशात फटका

कांदा पिकाला खानदेशात फटका
कांदा पिकाला खानदेशात फटका

धुळे  ः खानदेशात खरिपातील कांदा पिकाला अतिपावसाने फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रोपवाटिकांचे नुकसान झाले आहेत. तसेच पीकही वाया गेल्याची स्थिती आहे. यातच सरकारच्या धोरणाबाबत शेतकरी नाराजी व्यक्त करीत असून, दरवाढ रोखण्यासंबंधी शासनाचे प्रयत्न शेतकऱ्यांचे नुकसान करणारे असल्याचे म्हटले आहे.  खानदेशात खरिपात धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, नवापूर, जळगावमधील चोपडा, यावल, पाचोरा, धरणगाव, चाळीसगाव या भागांत कांद्याची लागवड केली जाते. यंदा सुमारे पाच हजार हेक्‍टरपर्यंत लागवड अपेक्षित होती. पावसात सातत्य असल्याने शेतकऱ्यांनी लागवडीची तयारी केली होती. परंतु साक्री, शिरपूर, चोपडा, यावल, जळगाव या भागात अतिवृष्टी व सततत्या पावसाने कांदा पिकाचे व रोपवाटिकांचे २० ते २५ टक्के नुकसान झाले. बारीक रोपे पावसामुळे कुजली. रोपांमध्ये तूट वाढली. ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्याच्या अखेरीस लागवड केली, त्यांच्या कांदा पिकाला अधिकचा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांनी १२०० ते २००० रुपये या दरात नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव भागांतून कांदा रोपांची खरेदी केली होती. वातावरण प्रतिकूल असल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. त्यातच मागील महिन्यात कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी लागवडीची तयारी केली होती. दर नियंत्रण करू नका कांदा पिकाची लागवड कमी झालेली असतानाच पुढे शेतकऱ्यांना दरांचा लाभ होऊ शकतो. परंतु, शासनाने दर कमी करण्यासाठी आयातीची तयारी केली आहे. तसेच, बाजारात कांदा दरांवर नियंत्रणासंबंधी शासकीय यंत्रणा हालचाली करीत आहेत. हा प्रकार कांदा लागवड कमी करणारा असून, शेतकऱ्यांचे मागील दोन वर्षे या प्रकारामुळे नुकसान झाल्याची नाराजी कापडणे (ता. धुळे) येथील शेतकरी तथा शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम बळिराम पाटील यांनी ॲग्रोवनशी बोलताना व्यक्त केली आहे.   कांदा लागवड कमी होण्यामागे शासनाचे धोरण जबाबदार आहे. कारण, उन्हाळ कांद्याला शेतकऱ्यांना ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. दर किमान १३०० रुपये मिळाले असते तर लागवड वाढली असती, पुढे कांद्याची टंचाईदेखील वाढली नसती. शासनाला आयात करण्याची वेळ आली नसती. शासनाने दर परवडणारे कसे राहतील, यावर अधिक भर द्यावा. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च लक्षात घ्यावा, असेही पाटील म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com