agriculture news in marathi, onion crops damage due to rain, nashik, maharashtra | Agrowon

नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ कांद्याची रोपे झाली खराब

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

महिनाभरापूर्वी झालेल्या पावसात उन्हाळ कांदा रोपे मोठ्या प्रमाणात सडून गेली. त्यानंतर बाहेरून कांदा उळे (बियाणे) आणून काही दिवसांपूर्वी पुन्हा दुसऱ्या टप्प्यात रोपे टाकली. मात्र मॉन्सूनोत्तर पाऊस दीर्घकाळ सुरूच राहिल्याने ही रोपेदेखील सडण्याचा मार्गावर आहेत. त्यातून पुढील रब्बी हंगामात उन्हाळ कांद्याची लागवड करण्यास उशीर होणार आहे. रोपे अधिक खराब झाल्याने उन्हाळ कांद्याची एकरी लागवडदेखील कमी होणार आहे.

- विजय भोरकडे,  कांदा उत्पादक, पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक.

नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे उन्हाळ कांद्याची रोपे खराब होत आहेत. परिणामी उन्हाळ कांदा लागवडीसाठी रोपांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता आहे. 

चांगल्या दराच्या अपेक्षेने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. आगामी उन्हाळ कांदा लागवडीसाठी टाकलेल्या रोपांचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी मिळेल तेथून कांद्याची रोपे खरेदी करीत आहेत. परिणामी कांदा लागवडीचा खर्च दुपटीने वाढला आहे. जिल्ह्यातील देवळा, कळवण, चांदवड व येवला तालुक्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने कांदा रोपांचे नुकसान होऊ लागले आहे. पाऊस अधिक झाल्याने जास्त काळ रोपांमध्ये पाणी साचून राहिल्याने रोपांची जागेवर कूज झाली. वातावरणात आर्द्रता अधिक राहिल्याने रोपांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे. अनेक ठिकाणी टाकलेली रोपे विरळ झाली असून काही ठिकाणी करप्याचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. रोपे टाकल्यानंतर पावसाने ओढ दिली होती; मात्र पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने उन्हाळ कांद्यासाठी टाकलेले उळे खराब होत आहेत. त्यातच उन्हाळ कांद्याची रोपे व बियाणे आता शिल्लक नाही, त्यामुळे पर्यायी पीक म्हणून शेतकरी गहू पेरणीचा निर्णय घेत आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...