Agriculture news in Marathi Onion cultivation on 1.5 lakh hectares in Nagar district | Page 2 ||| Agrowon

नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर कांदा लागवड

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 मार्च 2021

नगर जिल्ह्यात यंदा विक्रमी कांदा लागवड केली जात आहे. आतापर्यंत रब्बीत सुमारे १ लाख ५३ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. गतवर्षीपेक्षा सुमारे वीस हजार हेक्टर कांद्याचे क्षेत्र वाढले आहे.

नगर ः पाण्याची उपलब्धता असल्याने नगर जिल्ह्यात यंदा विक्रमी कांदा लागवड केली जात आहे. आतापर्यंत रब्बीत सुमारे १ लाख ५३ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. गतवर्षीपेक्षा सुमारे वीस हजार हेक्टर कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक तब्बल ३१ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे.

जिल्ह्यात यंदा पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी आहे. यंदा वेळेत ज्वारी पेरता आली नाही. त्या क्षेत्रावर तसेच कापसाचा हंगाम लवकरच आटोपला असल्याने त्याजागी कांद्याची लागवड केली जात आहे. त्यामुळे यंदा नगर जिल्ह्यात विक्रमी कांदा लागवड होणार असल्याचे दिसत आहे. आता काही ठिकाणी उन्हाळी कांदा लागवड सुरू झाली आहे.

गेल्या वर्षी रब्बी व उन्हाळी मिळून १ लाख ३० हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. यंदा फक्त रब्बीतच १ लाख ५३ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. अजून उन्हाळी लागवड व्हायची आहे. त्यामुळे यंदा कांद्याचे क्षेत्र पावणेदोन लाखाच्या जवळपास पोहोचण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. सध्या कांद्याच्या काही ठिकाणी काढणी केलेला कांदा बाजारात येत असून, दरात चढ-उतार होत आहे.

तालुकानिहाय लागवड क्षेत्र (हेक्टर)
नगर ः १८,५५७, पारनेर ः ३११७७, श्रीगोंदा ः २०१४७, कर्जत ः ११२७५, जामखेड ः २,५३५, शेवगाव ः ४,५७१, पाथर्डी ः ८,४०४, नेवासा ः ९,६६४, राहुरी ः १०,५९२, संगमनेर ः १०,४००, अकोले ः ४,८६६, कोपरगाव ः १०,६८१, श्रीरामपूर ः ७,६९८, राहाता ः ३,४०४


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...