Agriculture news in marathi Onion cultivation in Khandesh on 14000 hectares | Agrowon

खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा लागवड जवळपास पूर्ण झाली आहे. लागवड सुमारे १४ हजार हेक्‍टरवर झाली आहे. कांदा लागवडीची मजुरी यंदा महागली असून, एकरी सात हजार रुपयांपर्यंतचा खर्च येत आहे. परंतु टिकून राहिलेले दर व मुबलक जलसाठे यामुळे सर्वत्र कांदा लागवड झाली आहे. 

जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा लागवड जवळपास पूर्ण झाली आहे. लागवड सुमारे १४ हजार हेक्‍टरवर झाली आहे. कांदा लागवडीची मजुरी यंदा महागली असून, एकरी सात हजार रुपयांपर्यंतचा खर्च येत आहे. परंतु टिकून राहिलेले दर व मुबलक जलसाठे यामुळे सर्वत्र कांदा लागवड झाली आहे. 

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्‍यात सुमारे साडेचार हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. चाळीसगावात मागील हंगामात फक्त १२०० हेक्‍टरवर लागवड झाली होती. तर यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा भागात लागवड बऱ्यापैकी झाली आहे. धुळे जिल्ह्यात सुमारे चार हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातही सुमारे दोन हजार हेक्‍टरवर कांदा लागवड झाली आहे. धुळ्यात धुळे, शिरपूर, साक्री व शिंदखेडा या चारही तालुक्‍यांमध्ये कांदा लागवड वाढली आहे. तर नंदुरबारमध्ये शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा भागात कांदा लागवड अधिक झाल्याचे सांगण्यात आले. 

कांदा लागवड यंदा वाढेल, असा अंदाज यापूर्वीच कृषी यंत्रणांनी व्यक्त केला होता. कांद्याचे दर टिकून असल्याने अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. लागवड डिसेंबरपासून सुरू झाली. ही लागवड जानेवारी अखेरपर्यंत सुरू होती. कांदा लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केल्या होत्या. तर काही शेतकऱ्यांनी कांदा रोपे खरेदी करून लागवड करणे पसंत केले आहे. रोपवाटिकांचे दरही यंदा अधिक राहिले असून, एका अडीच फूट बाय ३० फुटांच्या वाफ्यातील रोपांचे दर तीन हजार रुपयांपर्यंत होते. एका वाफ्यात अर्धा एकरात कांदा लागवड करणे शक्‍य झाले. 

लागवडीसाठी विविध गावांमध्ये महिला मजुरांचे गट असून, या मजुरांकरवी लागवड शेतकऱ्यांनी उरकली. जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, धुळे तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये महिला मजुरांचे गट असून, त्यांची मदत शेतकरी लागवडीसाठी घेतात. एकरी सात हजार रुपये लागवडीनंतर लागलीच दिले जातात. तसेच त्यांना शेतापर्यंत आणण्यासाठीचा वाहतूक खर्चही शेतकऱ्यांना द्यावा लागला. तर मध्यंतरी कांदा रोपांवर करपा रोगही विषम वातावरणामुळे आला होता. त्याचा फटकाही बसला. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला असून, पुढे दर टिकून राहावेत किंवा किमान दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...
पुणे विभागात खरीप पेरणीत अडीच लाख...पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली...
बिबट्याच्या पिंजऱ्यांशेजारीच बसून करणार...मंचर : वनखात्यानेही बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी...
खरीप पीक कर्जासाठी भाजपचा आज ठिय्याअमरावती : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा...
औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला...औरंगाबाद ः आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म...
नगर जिल्ह्यात तुरीचा ५४ हजार हेक्टरवर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला...
रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ धरणे...रत्नागिरी ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
सांगलीत अडीच हजार क्विंटल मक्याची खरेदीसांगली ः जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या...
निकृष्ट बियाणे पुरवठादार कंपन्यांवर...अमरावती: निकृष्ट दर्जाच्या बियाणे पुरवठा प्रकरणात...
मराठवाडा विभागातील हवामानानुसार पीक...मराठवाडा विभागातील एकूण हवामान, पर्जन्यमान या...
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...