खानदेशात कांदा लागवड पूर्णत्वाकडे

जळगाव ः खानदेशात कांद्याची लागवड पूर्ण होत आली आहे. यंदा क्षेत्र सुमारे १८ हजार हेक्टर एवढे राहू शकते, असा अंदाज आहे. लागवड फारशी घटणार नाही, असे संकेत आहेत.
Onion cultivation in Khandesh is nearing completion
Onion cultivation in Khandesh is nearing completion

जळगाव ः खानदेशात कांद्याची लागवड पूर्ण होत आली आहे. यंदा क्षेत्र सुमारे १८ हजार हेक्टर एवढे राहू शकते, असा अंदाज आहे. लागवड फारशी घटणार नाही, असे संकेत आहेत. 

कांदा लागवडीसाठी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. धुळ्यात लागवड अधिक असते. तेथे सुमारे १० हजार हेक्टरवर लागवड झाल्याचा अंदाज आहे. नंदुरबारातही सुमारे दीड हजार हेक्टर आणि जळगाव जिल्ह्यात सुमारे सात हजार हेक्टरवर कांदा लागवड झाल्याचा अंदाज आहे. धुळ्यात बऱ्यापैकी असल्याने लागवडीत घट झालेली नसल्याची माहिती आहे. 

कांदा लागवड डिसेंबरच्या सुरवातीला सुरू झाली. जळगाव जिल्ह्यात सुमारे सहा ते साडेसहा हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित होती. जळगाव जिल्ह्यात चोपडा, धरणगाव, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, जामनेर, जळगाव या तालुक्यांत लागवड झाली आहे. कांद्याचे दर बऱ्यापैकी मिळाल्याने शेतकऱ्यांनी लागवड केली.

धुळ्यातील शिंदखेडा, साक्री भागात लागवड अधिक आहे. धुळे तालुक्यातील कापडणे, देवभाने, लामकानी, कुसुंबा आदी भागातही चांगली लागवड झाली आहे. कांद्याची लागवड यंदा खर्चिक ठरली आहे. कारण बियाण्याचे दर यंदा प्रतिकिलो चार हजार रुपयांपर्यंत होते. महागडे बियाणे व लागवड खर्च यामुळे खर्च अधिकचा आला आहे. 

लागवडीसाठी एकरी चार ते साडेचार हजार रुपये एवढा खर्च आला आहे. लागवडीला डिसेंबरच्या अखेरिस वेग आला. लाल कांद्याची लागवड अधिक झाली आहे. नंदुरबारात अक्कलकुवा, शहादा भागात पांढऱ्या कांद्याची लागवड काही कंपन्यांच्या मदतीने झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com