कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
बातम्या
खानदेशात कांदा लागवड सुरू
जळगाव ः खानदेशात लाल कांद्याची लागवड सुरू झाली असून, पुढील सात ते आठ दिवसांत लागवड पूर्ण होईल, अशी स्थिती आहे. या हंगामात लागवड कमी राहण्याचे संकेत आहेत.
जळगाव ः खानदेशात लाल कांद्याची लागवड सुरू झाली असून, पुढील सात ते आठ दिवसांत लागवड पूर्ण होईल, अशी स्थिती आहे. या हंगामात लागवड कमी राहण्याचे संकेत आहेत.
लाल कांद्याचे दर जुलैअखेरपर्यंत १२०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक झाले नाहीत. अलीकडे दरात काहीशी सुधारणा झाली आहे. परंतु, उन्हाळ कांदा पिकात नुकसान आल्याने अनेक शेतकरी लागवड टाळत आहेत. या हंगामातील खानदेशातील लागवड सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टरपर्यंत असेल, असे संकेत आहेत. लागवड धुळे जिल्ह्यातील साक्री व धुळे तालुक्यांत अधिक राहील, असे संकेत आहेत. कारण, या भागात पाऊसमान बरे आहे. पांझरा नदीला पूर आला. शिवाय जलपातळी वाढली आहे.
धुळे तालुक्यातील कापडणे, लामकानी, न्याहळोद, साक्रीमधील पिंपळनेर, कुडाशी, साक्री भागांत लागवड बऱ्यापैकी होईल. या भागात काही शेतकऱ्यांनी लागवड सुरू केली आहे. तर जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, एरंडोल, पाचोरा व धरणगाव तालुक्यांत लागवड सुरू झाली आहे. सध्या पाऊस नसल्याने शेतकरी लागलीच सिंचन करून घेत आहेत. काही शेतकरी उंचगादीवाफा व ठिबक तंत्राचा वापर करून लागवड करीत आहेत. मागील हंगामात सुमारे पाच हजार हेक्टरवर खानदेशात खरिपातील कांद्याची लागवड झाली होती.
लागवडीबाबत प्रतिसाद कमी असल्याने रोपवाटिका चालकांनी देखील रोपांचे दर आवाक्यात ठेवले आहेत. एका तीन फूट बाय ४० फुटाच्या वाफ्यातील रोप सुमारे एक ते दीड हजार रुपयाला दिले जात आहे. रोपे अनेक ठिकाणी तयार आहेत. साक्री, धुळे, यावल व जळगाव भागांतील काही शेतकरी रोपांसाठी नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगावला पसंती देत आहेत. पाऊसमान बऱ्यापैकी राहिल्याने रोपवाटिकांमधील कांदा रोपे जोमात आहेत, असे सांगण्यात आले.
- 1 of 914
- ››