Agriculture news in marathi; Onion cultivation in Khandesh started | Agrowon

खानदेशात कांदा लागवड सुरू

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑगस्ट 2019

जळगाव  ः खानदेशात लाल कांद्याची लागवड सुरू झाली असून, पुढील सात ते आठ दिवसांत लागवड पूर्ण होईल, अशी स्थिती आहे. या हंगामात लागवड कमी राहण्याचे संकेत आहेत. 

जळगाव  ः खानदेशात लाल कांद्याची लागवड सुरू झाली असून, पुढील सात ते आठ दिवसांत लागवड पूर्ण होईल, अशी स्थिती आहे. या हंगामात लागवड कमी राहण्याचे संकेत आहेत. 

लाल कांद्याचे दर जुलैअखेरपर्यंत १२०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक झाले नाहीत. अलीकडे दरात काहीशी सुधारणा झाली आहे. परंतु, उन्हाळ कांदा पिकात नुकसान आल्याने अनेक शेतकरी लागवड टाळत आहेत. या हंगामातील खानदेशातील लागवड सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्‍टरपर्यंत असेल, असे संकेत आहेत. लागवड धुळे जिल्ह्यातील साक्री व धुळे तालुक्‍यांत अधिक राहील, असे संकेत आहेत. कारण, या भागात पाऊसमान बरे आहे. पांझरा नदीला पूर आला. शिवाय जलपातळी वाढली आहे.

धुळे तालुक्‍यातील कापडणे, लामकानी, न्याहळोद, साक्रीमधील पिंपळनेर, कुडाशी, साक्री भागांत लागवड बऱ्यापैकी होईल. या भागात काही शेतकऱ्यांनी लागवड सुरू केली आहे. तर जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, एरंडोल, पाचोरा व धरणगाव तालुक्‍यांत लागवड सुरू झाली आहे. सध्या पाऊस नसल्याने शेतकरी लागलीच सिंचन करून घेत आहेत. काही शेतकरी उंचगादीवाफा व ठिबक तंत्राचा वापर करून लागवड करीत आहेत. मागील हंगामात सुमारे पाच हजार हेक्‍टरवर खानदेशात खरिपातील कांद्याची लागवड झाली होती. 

लागवडीबाबत प्रतिसाद कमी असल्याने रोपवाटिका चालकांनी देखील रोपांचे दर आवाक्‍यात ठेवले आहेत. एका तीन फूट बाय ४० फुटाच्या वाफ्यातील रोप सुमारे एक ते दीड हजार रुपयाला दिले जात आहे. रोपे अनेक ठिकाणी तयार आहेत. साक्री, धुळे, यावल व जळगाव भागांतील काही शेतकरी रोपांसाठी नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगावला पसंती देत आहेत. पाऊसमान बऱ्यापैकी राहिल्याने रोपवाटिकांमधील कांदा रोपे जोमात आहेत, असे सांगण्यात आले. 


इतर बातम्या
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
आगामी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून...अकोला  : सोयाबीन पिकाखालील पेरणी...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
कलाग्रामच्या माध्यमातून बचत गटांसाठी...नाशिक : दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकमध्ये...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...