खानदेशात कांदा लागवड सुरूच

खानदेशात कांदा लागवड सुरूच
खानदेशात कांदा लागवड सुरूच

जळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे चार हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. लागवड आणखी आठवडाभर किंवा १० दिवस सुरू राहू शकते. क्षेत्र यंदा वाढेल, असेही स्पष्ट झाले आहे.  कांदा लागवड धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा व जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, पाचोरा, जळगाव, धरणगाव या भागात अधिकची झाली आहे. मागील हंगामात खानदेशात मिळून सुमारे चार हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. यंदा ही लागवड सुमारे साडेसहा हजार हेक्‍टरपर्यंत होवू शकते.  एकट्या धुळे तालुक्‍यात सुमारे एक हजार ते ११०० हेक्‍टरवर कांदा लागवड अपेक्षित आहे. तर चोपडा, यावल व रावेरात मिळून सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरवर कांदा लागवड होऊ शकते. कांद्याचे दर बाजारात सध्या कमी अधिक होत आहेत. परंतु बाजारात उठाव कायम आहे. दर किमान १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com