Agriculture news in Marathi Onion cultivation in Khandesh will be affected | Agrowon

खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील कांदा लागवडीवर महागडे बियाणे व इतर कारणांमुळे परिणाम होईल, अशी स्थिती आहे. लागवड धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात कमी होऊ शकते.

जळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील कांदा लागवडीवर महागडे बियाणे व इतर कारणांमुळे परिणाम होईल, अशी स्थिती आहे. लागवड धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात कमी होऊ शकते.

गेल्या हंगामात जळगाव जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सुमारे १४ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. धुळ्यातही सुमारे १० हजार हेक्टरवर उन्हाळ कांदा होता. तर नंदुरबारातही सुमारे अडीच हजार हेक्टरवर कांदा होता. कारण गेल्या वर्षी पाऊस चांगला होता. पण गेल्या वर्षी मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. कोरोनामुळे बाजार समित्यांचे कामकाज बंदावस्थेत गेले. यामुळे दर कमी मिळाले. अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. यंदाही पाऊस चांगला आहे. पाणी अवर्षणप्रवण भागातही मुबलक आहे.

उन्हाळ कांद्यासाठी जळगाव जिल्ह्यात चोपडा, पाचोरा, धरणगाव, जामनेर आदी भाग प्रसिद्ध आहे. धुळ्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा भागात कांद्याची लागवड बऱ्यापैकी होते. तर नंदुरबारमधील नंदुरबार व नवापूर तालुक्यात कांदा लागवड बऱ्यापैकी होत असते. यंदा ही लागवड वाढेल, असे सुरुवातीला वाटत होते. परंतु बियाण्याचे दर वाढले आहेत. प्रतिकिलो ३००० ते ४२०० रुपये दर कांदा बियाण्यासाठी घेतले जात आहेत. एकरी एक किलो बियाणे हवे असते. खरिपातील कांदा बियाण्याबाबत कमी उगवणशक्तीच्या अनेक तक्रारी आल्या. यामुळे हे बियाणे किती उगेल, याची शाश्‍वती नाही.

गेल्या वर्षी कांदा बियाणे १००० ते १२०० रुपये प्रतिकिलो, या दरात मिळत होते. यंदा बियाण्याची मोठी टंचाई आहे. अधिक मागणी असलेले बियाणे बाजारात उपलब्ध नाही. काळाबाजारही सुरू आहे. यामुळे शेतकरी संभ्रमातही आहेत. परिणामी कांदा लागवड कमी होईल, अशी स्थिती आहे. कांद्याचे दर सध्या चांगले आहेत. परंतु पुढे दर टिकून राहतील, का हा मुद्दा आहे. कांदा लागवड खानदेशात यंदा २० ते २५ टक्के कमी होवू शकते, असा अंदाज आहे.

सध्या कांद्याचे दर वाढले आहेत. पण अपवादानेच शेतकऱ्यांकडे कांदा आहे. बियाणे महाग आहे. यामुळे शेतकरी कांदा लागवड टाळत असल्याची स्थिती आहे.
- आत्माराम पाटील, शेतकरी, कापडणे, जि. धुळे


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी, संगमेश्‍वरसाठी भात खरेदी सुरूरत्नागिरी  : रत्नागिरी व संगमेश्‍वर...
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
गहू, ज्वारी पिकांवरील खोडमाशीचे...बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे...
पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी...रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात लसूण ५००० ते १३००० रुपयेनाशिकमध्ये ६२०० ते ११५०० रुपये  नाशिक :...
उत्तम भाजीपाला उत्पादनासाठी पोषक हवामानवाटाणा वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...