agriculture news in marathi onion of cultivation on micro irrigation system | Agrowon

सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवड

बी.डी. जडे
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

कांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. त्यामुळे पिकास मुळांच्या कक्षेमध्ये आवश्यकतेइतका पुरवठा करता येतो. मुळांजवळ वाफसा स्थिती असल्याने अन्नद्रव्यांची उचल चांगली होते.  
 

कांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. त्यामुळे पिकास मुळांच्या कक्षेमध्ये आवश्यकतेइतका पुरवठा करता येतो. मुळांजवळ वाफसा स्थिती असल्याने अन्नद्रव्यांची उचल चांगली होते.  

खरीप हंगामातील कांदा पिकावर हवामान बदल, अतिपाऊस, अधिक आर्द्रता, ढगाळ हवामानाचा मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. खरीपासोबत रब्बी हंगामातील कांदा रोपवाटिकेच मोठे नुकसान झाले आहे. 

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कांदा लागवड ही पारंपरिक पद्धतीने केली जाते. त्यातही सपाट वाफा आणि सरी वरंबा पद्धतीने लागवड करण्यावर जास्त भर असतो. सिंचनासाठी पाटपाणी पद्धतीचा अवलंब केला जातो. या पारंपरिक पद्धतीऐवजी शेतकऱ्यांनी गादी वाफ्यावर कांदा लागवड करावी. गादी वाफ्याची रुंदी ३ फूट आणि उंची १० ते १२ इंच इतकी असावी. गादी वाफे करताना रासायनिक खतांची शिफारशीत मात्रा आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीमध्ये चांगली मिसळून टाकावीत. यामुळे पिकाची वाढ संतुलित होण्यास मदत होते. पिकाच्या सिंचनासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन  या पैकी एका सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. या पद्धतीमुळे पाण्यामध्ये बचत होते. पिकास आवश्यक तितका व विभागून सिंचन करता येतो. विभागून विद्राव्य खते दिल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. खतांचा होणारा ऱ्हास टाळता येतो. कोणत्याही पिकांच्या चांगल्या वाढीसाठी मुळांजवळ वाफसा असणे आवश्‍यक असते. पिकाजवळी ल आर्द्रतेचे प्रमाणही योग्य राखता येते. अति आर्द्रतेमुळे येणारे करपासारखे रोग टाळता येतात.

सूक्ष्मसिंचन पद्धतीचे फायदे 

  • या पद्धतीद्वारे पाणी वापरामध्ये ४० ते ५० टक्के बचत होते.
  • जमीन कायम वाफसा स्थितीत राहत असल्यामुळे उत्पादनात वाढ होते.
  • सूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.
  • ठिबक सिंचनाद्वारे खत दिल्यामुळे २५ टक्के खतांची बचत होते.
  • या पद्धतीमध्ये पाणी, वेळ आणि विजेची बचत होऊन अधिक क्षेत्रावर पिकांची लागवड शक्य होते.
  • सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीच्या वापरामुळे दव आणि धुक्यापासून कांदा पिकाचे संरक्षण होते. तसेच फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.या पद्धतीमुळे कांद्याची उत्तम गुणवत्ता मिळते. आणि उत्पादनात वाढ होते.

संपर्क ः बी.डी.जडे, ९४२२७७४९८१, (वरिष्ठ कृषी विद्या तज्ज्ञ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव)


इतर नगदी पिके
उन्हाळी कांदा पिकाची काढणी, साठवणूक कांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची निवड...
उन्हाळ्यात राबवा प्रभावी सिंचन...पाणी हा ऊस उत्पादनातील अतिशय महत्त्वाचा व...
खोडवा ऊस व्यवस्थापनाचे सुधारित तंत्रराज्यामध्ये तिन्ही हंगामांतील ऊस  तुटून...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरसूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची उसाच्या पानांवर...
दर्जेदार कांदा बीजोत्पादनासाठी...उत्तम कांदा बीजोत्पादनासाठी कंदाच्या योग्य...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
व्यवस्थापन ऊस पाचटाचे ...पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच...
सुरू उसातील सूक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापनमाती परीक्षण अहवालानुसार जमिनीत या सूक्ष्म...
नियोजन सुरू ऊस लागवडीचे...सुरू हंगामातील ऊस लागवड १५ डिसेंबर ते १५...
ऊस पिकावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापनपश्‍चिम महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यापासून ते...
आरआरसी’ म्हणजे काय रे भाऊ...?राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर...
गुलाबी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापनाकडे...सध्या अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या...
सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवडकांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
वेचणीयोग्य कपाशीला येत्या पावसाची चिंतामाझे कापसाचे पीक जवळपास ११५ ते १२० दिवसांचे झाले...
दर्जेदार कांदा रोपनिर्मितीचे तंत्रमहाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोरायनेस्पोरा बुरशीजन्य पानांवरील ठिपके...कपाशीचे पीक हे सध्या ६० ते ७५ दिवसांचे आहे....
कपाशीवरील रस शोषक किडींचे एकात्मिक...सध्या ढगाळ वातावरण कायम असून, कपाशीवर रस शोषक...
कपाशीतील बोंडे सडण्यावरील उपाययोजनामहाराष्ट्राच्या प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात...