नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार हेक्टरने वाढ

नाशिक : प्रतिकूल परिस्थितीत नाशिक विभागात खरीप कांद्याच्या लागवडीचा टक्का वाढला आहे. मात्र, हवामान बदलांचा फटका बसत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
 Onion cultivation in Nashik division increased by 8000 hectares
Onion cultivation in Nashik division increased by 8000 hectares

नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी रोपांची मर, बियाणे उपलब्धता या अडचणी मोठ्या प्रमाणावर होत्या. सततचा पाऊस, ढगाळ हवामान व सूर्य प्रकाशाचाअभाव, यामुळे रोपवाटिका बाधित झाल्या होत्या. अशा प्रतिकूल परिस्थितीत नाशिक विभागात खरीप कांद्याच्या लागवडीचा टक्का वाढला आहे. मात्र, हवामान बदलांचा फटका बसत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पर्जन्यमान चांगले असल्याने नियोजित लागवडीच्या तुलनेत ही लागवड ८ हजार हेक्टरने वाढल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 

लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार ९०९ हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात विभागात एकूण ३१ हजार २९३ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९१२ हेक्टर क्षेत्रावर अधिक लागवडी आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात चालू वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत भर पडली आहे. धुळे जिल्ह्यातही वाढ दिसून येते. जळगाव जिल्ह्यात मागील वर्षी लागवडी नव्हत्या, मात्र चालू वर्षी त्या झाल्या आहेत. तर, नंदुरबार जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत आहे. 

नाशिक जिल्ह्यात सर्वधिक लागवडी चांदवड, येवला व मालेगाव तालुक्यात आहेत. सटाणा, नांदगाव, देवळा, निफाड, सिन्नर या तालुक्‍यांतही बऱ्यापैकी झाल्या आहेत. तर, कळवण व दिंडोरी तालुक्यात तुरळक लागवडी आहेत.

रोगांचा वाढता प्रादुर्भाव

दरातील अस्थिरता असूनही शेतकऱ्यांनी कांद्याला पसंती दिल्याचे चित्र आहे. मात्र, रोपांचा प्रादुर्भाव लागवडीपासून वाढता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

खरीप लाल कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, रोगांचा प्रादुर्भाव अधिक आहे. आता वातावरण खराब असल्याने व रोगांचा प्रादुर्भाव अधिक असल्याने उत्पादकता घटणार, असा अंदाज आहे. - डॉ. सतिष भोंडे, माजी अतिरिक्त संचालक, एनएचआरडीएफ.

सुरुवातीला रोपे टाकली, मात्र ती खराब झाली. पुन्हा रोपे तयार करून टाकून लागवडी पूर्ण केल्या. नियमित कांदा लागवड करतो. मात्र, रोपे खराब होऊन लागवडी खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. - अमोल गागरे, कांदा उत्पादक, वागदर्डी, ता. चांदवड

कांदा लागवड स्थिती (हेक्‍टरमध्ये) 

जिल्हा वर्ष २०१९ वर्ष २०२०
नाशिक २२७९९ २३०७८
धुळे २९७७ ४४९६
जळगाव  ० ११७९
नंदुरबार ६०५ २५४०
एकूण २६३८ ३१२९३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com