agriculture news in marathi Onion on eight thousand hectares in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात आठ हजार हेक्‍टरवर कांदा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जानेवारी 2021

सातारा ः कांद्याचा दरातील तेजीमुळे लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील आठ हजार २६६ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे.

सातारा ः कांद्याचा दरातील तेजीमुळे लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील आठ हजार २६६ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. अजूनही एक महिना कांदा लागवड सुरू राहील. त्यामुळे जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड होण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा या दुष्काळी तालुक्यांत रब्बी हंगामात कांदा हे प्रमुख पिकांपैकी एक आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून कांद्याचे दर तेजीत आहेत. सलग दोन वर्षांत कांदा दर प्रति किलोस ७० ते ८० रुपयांवर गेला होता. सध्या कांद्यास क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये दर मिळत आहेत. दरातील तेजीमुळे कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. 

परतीचा व अवकाळी पाऊस रब्बी हंगामाच्या सुरवातीस झाल्याने पाण्याची उपलब्धता वाढली आहे. विशेषतः: दुष्काळी तालुक्‍यात पाऊस चांगला झाला. त्यामुळे पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे दुष्काळी तालुक्‍यांत कांद्याच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे.

दुष्काळी तालुक्‍यांव्यतिरिक्त सातारा, कऱ्हाड, वाई, जावळी या पश्‍चिमेकडील तालुक्‍यांतही कांद्याचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. या तालुक्‍यात कांद्यास आंतरपीक म्हणून प्राधान्य दिले जाते. लागणीचे ऊस तुटल्यानंतरही कांदा लागवड सुरू राहील. त्यामुळे १२ हजार हेक्टर कांद्याचे क्षेत्र जाण्याची शक्यता आहे. 

रोपांच्या दरात सुधारणा  

कांद्याच्या दरातील सुधारणेमुळे कांद्याच्या रोपांचेही दर सुधारले आहेत. शेतकऱ्यांकडून मिळेल त्या दरात कांद्याच्या रोपांची खरेदी केली जात आहे. वाफ्यावर होणारी रोपांची लागवड आता फुटावर केली जात आहे.

रोपांच्या दहा फुटाच्या वाफ्यास सात ते आठ हजारांपर्यंत दर मिळत आहेत. एकरी रोपांसाठी ४० ते ४५ हजार रुपये खर्च येत आहे. या हंगामात कांद्याच्या बियाण्याचे दर सुरुवातीपासून तेजीत होते. या हंगामात सर्वाधिक प्रतिकिलोस तीन ते चार हजार रुपयांवर दर गेले होते. यामुळे कांदा पिकांच्या भांडवली खर्चात वाढ झाली आहे.


इतर ताज्या घडामोडी
नव्या कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना...नाशिक : श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू...
येवल्यात ४६ हजार ग्राहकांकडे २६६ कोटी...येवला, जि. नाशिक : तालुक्यातील कृषिपंप धारकांची...
हवामान बदलाचा आंब्यावरील परिणाम...रत्नागिरी ः वातावरणातील चढ-उताराचे आंबा पिकावर...
परभणीत तूर विक्रीसाठी ६ हजार...परभणी ः आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी...
आम्हाला सोडून गेले, ते पराभूत झाले :...नगर : राज्य विधानसभेत मी १९८० साली ५६ आमदारांचा...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या...नागपूर ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून...
पी. आर. पाटील साखर संघाचे पुढील अध्यक्ष... कुरळप, जि. सांगली :  सहकार क्षेत्रातील...
निळेली पशुधन संशोधन केंद्रास वंश...सिंधुदुर्गनगरी ः कोकण कन्याळ या शेळी जातीच्या...
सिंधुदुर्गमध्ये बांधले साडेपाच हजार...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात भासणाऱ्या संभाव्य...
अमरावतीत शेतकऱ्यांवर ४३ कोटींच्या...अमरावती : हंगामात बॅंकांकडून पीककर्जाच्या बाबतीत...
भंडाऱ्यात ८९५ शेतकऱ्यांचे सूक्ष्म...भंडारा : सूक्ष्म सिंचनाला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा...
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदीरायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान...
‘किसान गणतंत्र परेड’ शांततेतच होणार नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा एक...
नक्षत्रांचे गणित चुकू लागलेगावातील वयोवृद्ध माणसे हाताच्या बोटांवर गणिते करत...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
हवामान बदलाला अनुरूप पीक पद्धतीची गरजजागतिक पातळीवर विविध मार्गांनी हवेमधील कार्बन...
कृषी कायद्यांविरोधात शेतकरी विधवांचा...यवतमाळ : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख ७० हजार...नांदेड : जिल्ह्यात रब्बीमध्ये दोन लाख सत्तर हजार...
पावणेतीन हजार कोटींची कामे मंजूर ः...नांदेड : ‘‘कारोना संसर्गाच्या काळात विकास...
खानदेशातील प्रकल्पांत ५८ टक्के पाणीजळगाव ः खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये...