नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
बातम्या
सातारा जिल्ह्यात आठ हजार हेक्टरवर कांदा
सातारा ः कांद्याचा दरातील तेजीमुळे लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील आठ हजार २६६ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे.
सातारा ः कांद्याचा दरातील तेजीमुळे लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील आठ हजार २६६ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. अजूनही एक महिना कांदा लागवड सुरू राहील. त्यामुळे जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड होण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा या दुष्काळी तालुक्यांत रब्बी हंगामात कांदा हे प्रमुख पिकांपैकी एक आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून कांद्याचे दर तेजीत आहेत. सलग दोन वर्षांत कांदा दर प्रति किलोस ७० ते ८० रुपयांवर गेला होता. सध्या कांद्यास क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये दर मिळत आहेत. दरातील तेजीमुळे कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
परतीचा व अवकाळी पाऊस रब्बी हंगामाच्या सुरवातीस झाल्याने पाण्याची उपलब्धता वाढली आहे. विशेषतः: दुष्काळी तालुक्यात पाऊस चांगला झाला. त्यामुळे पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे दुष्काळी तालुक्यांत कांद्याच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे.
दुष्काळी तालुक्यांव्यतिरिक्त सातारा, कऱ्हाड, वाई, जावळी या पश्चिमेकडील तालुक्यांतही कांद्याचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. या तालुक्यात कांद्यास आंतरपीक म्हणून प्राधान्य दिले जाते. लागणीचे ऊस तुटल्यानंतरही कांदा लागवड सुरू राहील. त्यामुळे १२ हजार हेक्टर कांद्याचे क्षेत्र जाण्याची शक्यता आहे.
रोपांच्या दरात सुधारणा
कांद्याच्या दरातील सुधारणेमुळे कांद्याच्या रोपांचेही दर सुधारले आहेत. शेतकऱ्यांकडून मिळेल त्या दरात कांद्याच्या रोपांची खरेदी केली जात आहे. वाफ्यावर होणारी रोपांची लागवड आता फुटावर केली जात आहे.
रोपांच्या दहा फुटाच्या वाफ्यास सात ते आठ हजारांपर्यंत दर मिळत आहेत. एकरी रोपांसाठी ४० ते ४५ हजार रुपये खर्च येत आहे. या हंगामात कांद्याच्या बियाण्याचे दर सुरुवातीपासून तेजीत होते. या हंगामात सर्वाधिक प्रतिकिलोस तीन ते चार हजार रुपयांवर दर गेले होते. यामुळे कांदा पिकांच्या भांडवली खर्चात वाढ झाली आहे.
- 1 of 1498
- ››