बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यात

रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हा शेतमाल कमी खर्चात थेट बांगलादेशात जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेल्वेची मागणी वाढत जाणार आहे. हा पर्याय किफायतशीर व सोपा आहे. लॉकडाऊनमध्ये अडचणी आल्या. मात्र आता थेट पर्याय उपलब्ध झाल्याने कामात सुलभता येईल. - विशाल भंडारी, कांदा निर्यातदार, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक.
Obnio
Obnio

नाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा बांगलादेशमध्ये निर्यात होतो. मात्र निर्यातबंदीमुळे मागणी व पुरवठा साखळी बिघडली. पुढे निर्यातबंदी उठली मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीत बांगलादेशमध्ये माल जाण्यापूर्वी स्थानिक बंगाल सरकारचा विरोध झाल्याने अडचणी आल्या. मात्र आता विशेष रेल्वेद्वारे थेट बांगलादेशात कांदा निर्यातीची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे नाशिकमधून पहिल्या टप्प्यात सोमवार(ता.६) ४२ बोगीच्या माध्यमातून १६०० टन कांद्याची निर्यात झाली आहे.  लॉकडाऊन दरम्यान केंद्राने निर्यातीच्या सूचना दिल्या होत्या. मात्र पश्‍चिम बंगाल सरकारने हरकत आणल्याने काम ठप्प होते. मात्र आता बांगलादेशमधील स्थानिक कांदा संपत आला आहे. तसेच पश्‍चिम बंगालमधील सुख सागर येथील कांदा स्थानिक ठिकाणी वितरित होत असल्याने मागणी वाढली आहे. त्यातच आता वाहतुकीची अडचण मिटल्याने निर्यातदारांमध्ये संतोषाचे वातावरण आहे. चालू वर्षी मे व जून महिन्यात रस्ते व रेल्वेच्या माध्यमातून जवळपास दीड लाख टनांवर कांदा निर्यात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.  भारत-बांगलादेश सरकारच्या माध्यमातून विशेष परवानगीने काही निर्यातदारांनी मका, डाळ निर्यात केली होती. त्यानंतर शेतमाल वाहतुकीसाठी पाठपुरावा केल्यानंतर व्यापारवृद्धीसाठी येथील बेनापोल-पेत्रपोल रेल्वे लिंकद्वारे कंटेनर ट्रेन सर्व्हिस सुरू करण्यास बांगलादेशने मंजुरी दिली आहे. आत्तापर्यंत रेल्वेद्वारे मालदा येथे उतरवून तो बांगलादेश मध्ये जायचा. आता थेट बांगलादेशात रेल्वे वाहतुकीची सुविधा झाल्याने कामास गती येणार असल्याचे निर्यातदारांनी सांगितले.

रेल्वे वाहतुकीचे फायदे

  • माल थेट जाणार असल्याने कामकाज सोपे
  • रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हाताळणी प्रक्रिया अत्यल्प
  • रस्ते वाहतूक खर्च अधिक येत रेल्वेने खर्चात बचत
  • रस्ते वाहतुकीत होणाऱ्या चोऱ्या व अपघात कमी होण्यास मदत होईल.
  • प्रतिनिधी लॉकडाऊनमध्ये २० बोगीची एक रॅक १५०० कि.मी. मर्यादेपर्यंत उपलब्ध करून दिले होते. आता ४२ बोगी मर्यादा घालून देण्यात आली आहे. ट्रक भाडे प्रतिकिलो ६ रुपये प्रमाणे भाडे द्यावे लागायचे आता रेल्वेच्या माध्यमातून २.२५ रुपयात लागेल. याचा परिणाम दरावर नक्की होईल. -मनोज जैन,  कांदा निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com