agriculture news in Marathi Onion export to Bangladesh by railway Maharashtra | Page 2 ||| Agrowon

बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यात

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हा शेतमाल कमी खर्चात थेट बांगलादेशात जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेल्वेची मागणी वाढत जाणार आहे. हा पर्याय किफायतशीर व सोपा आहे. लॉकडाऊनमध्ये अडचणी आल्या. मात्र आता थेट पर्याय उपलब्ध झाल्याने कामात सुलभता येईल.
- विशाल भंडारी, कांदा निर्यातदार, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक.

नाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा बांगलादेशमध्ये निर्यात होतो. मात्र निर्यातबंदीमुळे मागणी व पुरवठा साखळी बिघडली. पुढे निर्यातबंदी उठली मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीत बांगलादेशमध्ये माल जाण्यापूर्वी स्थानिक बंगाल सरकारचा विरोध झाल्याने अडचणी आल्या. मात्र आता विशेष रेल्वेद्वारे थेट बांगलादेशात कांदा निर्यातीची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे नाशिकमधून पहिल्या टप्प्यात सोमवार(ता.६) ४२ बोगीच्या माध्यमातून १६०० टन कांद्याची निर्यात झाली आहे. 

लॉकडाऊन दरम्यान केंद्राने निर्यातीच्या सूचना दिल्या होत्या. मात्र पश्‍चिम बंगाल सरकारने हरकत आणल्याने काम ठप्प होते. मात्र आता बांगलादेशमधील स्थानिक कांदा संपत आला आहे. तसेच पश्‍चिम बंगालमधील सुख सागर येथील कांदा स्थानिक ठिकाणी वितरित होत असल्याने मागणी वाढली आहे. त्यातच आता वाहतुकीची अडचण मिटल्याने निर्यातदारांमध्ये संतोषाचे वातावरण आहे. चालू वर्षी मे व जून महिन्यात रस्ते व रेल्वेच्या माध्यमातून जवळपास दीड लाख टनांवर कांदा निर्यात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

भारत-बांगलादेश सरकारच्या माध्यमातून विशेष परवानगीने काही निर्यातदारांनी मका, डाळ निर्यात केली होती. त्यानंतर शेतमाल वाहतुकीसाठी पाठपुरावा केल्यानंतर व्यापारवृद्धीसाठी येथील बेनापोल-पेत्रपोल रेल्वे लिंकद्वारे कंटेनर ट्रेन सर्व्हिस सुरू करण्यास बांगलादेशने मंजुरी दिली आहे. आत्तापर्यंत रेल्वेद्वारे मालदा येथे उतरवून तो बांगलादेश मध्ये जायचा. आता थेट बांगलादेशात रेल्वे वाहतुकीची सुविधा झाल्याने कामास गती येणार असल्याचे निर्यातदारांनी सांगितले.

रेल्वे वाहतुकीचे फायदे

  • माल थेट जाणार असल्याने कामकाज सोपे
  • रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हाताळणी प्रक्रिया अत्यल्प
  • रस्ते वाहतूक खर्च अधिक येत रेल्वेने खर्चात बचत
  • रस्ते वाहतुकीत होणाऱ्या चोऱ्या व अपघात कमी होण्यास मदत होईल.

प्रतिनिधी
लॉकडाऊनमध्ये २० बोगीची एक रॅक १५०० कि.मी. मर्यादेपर्यंत उपलब्ध करून दिले होते. आता ४२ बोगी मर्यादा घालून देण्यात आली आहे. ट्रक भाडे प्रतिकिलो ६ रुपये प्रमाणे भाडे द्यावे लागायचे आता रेल्वेच्या माध्यमातून २.२५ रुपयात लागेल. याचा परिणाम दरावर नक्की होईल.
-मनोज जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक


इतर बातम्या
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...