Agriculture news in Marathi, Onion exports, the process needs to be emphasized: Dr. Vishwanatha | Agrowon

कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः डॉ. विश्वनाथा
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍चितता दूर करण्यासाठी मार्केट इंटेलिजन्स, निर्यात आणि प्रक्रिया यावर भर देण्याची गरज असल्याचे मत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी व्यक्त केले. 

राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍चितता दूर करण्यासाठी मार्केट इंटेलिजन्स, निर्यात आणि प्रक्रिया यावर भर देण्याची गरज असल्याचे मत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी व्यक्त केले. 

येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालयाचा २२वा स्थापना दिवस सोमवारी साजरा करण्यात आला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विश्वनाथा बोलत होते. या वेळी संचालनालयाचे माजी संचालक डॉ. के. इ. लवांडे, राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. एन. पी. सिंग, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र संचालक डॉ. इंदू सावंत, संचालनालयाचे संचालक डॉ. मेजर सिंग, मुख्य संशोधक डॉ. विजय महाजन उपस्थित होते. 

डॉ. विश्वनाथा म्हणाले, ‘‘कांद्याच्या उत्पादकतेमध्ये आणि क्षेत्रामध्ये वाढ होऊन देशाचे कांदा उत्पादन वाढले, परंतु कांदा बाजारभावातील अनिश्‍चितता दूर झाली नाही. कांद्यासाठी किमान विक्री किंमत सरकारकडून ठरवली जावी. तसेच शेतकऱ्यांचा सहभाग असणाऱ्या कांदा बोर्ड सारख्या संस्थेची स्थापना करण्यात यावी.’’

डॉ. लवांडे म्हणाले, ‘‘संस्थेच्या स्थापनेवेळी ४० लाख टन देशाचे कांदा उत्पादन होते. ते आता २२४ लाख टन एवढे वाढले आहे. कांदा उत्पादनवाढीसाठी संशोधकांचे काम कौतुकास्पद आहे. या पुढे संस्थेला कांद्याचे रोगप्रतिरोधक व प्रक्रियाक्षम तसेच संकरित वाण विकसित करण्यावर भर देणे गरजेचे आहे.’’ 

संस्थेच्या स्थापनेपासून शेतकऱ्यांसाठी संस्थेने उच्च उत्पादनक्षम कांद्याच्या १० जाती आणि लसणाच्या २ जाती, तसेच सुधारित कांदा चाळी, खरीप कांदा लागवड तंत्रज्ञान, ठिबक सिंचन असे तंत्रज्ञान विकसित केल्याने त्याचा लाभ देशभरातील अनेक शेतकऱ्यांना झाल्याचे डॉ. मेजर सिंग यांनी सांगितले. 

या वेळी कांदा व लसणाच्या उत्पादनात प्रगतशील असणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना कांदा बियाणे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. राजीव काळे यांनी केले. डॉ. विजय महाजन यांनी आभार व्यक्त केले.

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...