Onion exports should be open; Otherwise movement
Onion exports should be open; Otherwise movement

कांदा निर्यात खुली करावी; अन्यथा आंदोलन

कांद्यावर निर्यातबंदी लादण्यात आली त्याच तातडीने आता कांद्याची निर्यात खुली करावी, या मागणीसाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे.

नाशिक : केंद्र सरकारने विविध कांदाप्रश्नी विविध निर्बंध लादल्यानंतर दर घसरल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. ज्या तातडीने कांद्यावर निर्यातबंदी लादण्यात आली त्याच तातडीने आता कांद्याची निर्यात खुली करावी, या मागणीसाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. परंतु त्यासाठी कोणत्याही बाजार समितीने आपले कांदा लिलावाचे कामकाज बंद ठेवू नये, अशी भूमिका राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने घेतली आहे.

याबाबत संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले की, कांद्याचे बाजार भाव प्रतिक्विंटलला चार हजारांच्या घरात गेल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने १४ सप्टेंबर रोजी कांद्यावर निर्यात बंदी केली.त्यानंतर परदेशी कांदा आयात करणे सुरू केले. तसेच कांदा व्यापारी यांना साठा मर्यादा घालून दिल्या. अशा निर्बंधांमुळे कांद्याचे बाजारभाव घसरण होत राहिली. आता या आठवड्यात लासलगावसह महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याचे दर सरासरी १ हजार रुपये प्रतिक्विंटल इतके घसरले.

सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळामध्ये काही बाजार समित्या सलग २ महिने तर काही बाजार समित्या कधी आठवडा तर कधी २ आठवडे अशा बंद राहिल्या. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडाभर नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे लिलावाचे कामकाज बंद होते. पुढे दिवाळीत जिल्ह्याच्या बाजार समिती १० दहा दिवस बंद होत्या. बाजार समित्यांचे कामकाज सतत बंद राहून पुन्हा सुरू झाल्यानंतर एकदम कांद्याची जास्त आवक होऊन कांद्याचे बाजारभाव अजून कोसळतात आणि कांदा उत्पादकांना त्याचा आर्थिक फटका बसतो आहे. संघटनेने विविध जिल्ह्यांमध्ये तहसीलदार यांना कांद्याची निर्यातबंदी तत्काळ हटवावी, यासाठी निवेदन पत्र देण्यात आले आहे.

अन्यथा, बाजार समित्यांवर कारवाई करावी सुट्टीचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी राज्यातील बाजार समित्यांचे कांद्याचे लिलाव बंद राहिल्यास संबंधित बाजार समित्यांवर बरखास्तीची कारवाई करावी, अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्य सरकारकडे करण्यात येईल, असे राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून कळविण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com