agriculture news in Marathi onion farmer ditch by traders Maharashtra | Agrowon

तोतया व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची फसवणूक

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

सध्या मागणीच्या तुलनेत सध्या कांद्याची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे उठाव असल्याने दरात तेजी आहेच.

नाशिक : सध्या मागणीच्या तुलनेत सध्या कांद्याची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे उठाव असल्याने दरात तेजी आहेच. या दरम्यान तुमच्या शेतीमालाला चांगले पैसे देतो, असे प्रलोभन दाखवीत शेतकऱ्याचा विश्‍वास संपादन करत देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याची एका तोतया व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे.

देवळा तालुक्यातील मटाणे येथील कांदा उत्पादक नानाजी निंबा साबळे (वय ५८) यांनी इजियाज अन्सारी याच्या सांगण्यावरून बुधवारी (ता. १८) सायंकाळच्या सुमारास पिक-अप वाहनात २९ क्विंटल ४५ किलो (६० गोण्या) कांदा विक्रीसाठी नाशिकमध्ये आणला होता. त्या वेळी संशयिताने पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड येथे त्यांच्याशी चर्चा करून विश्‍वास संपादन करत पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डात बोलावले. तेथे मुन्ना ट्रेडिंग कंपनीसमोर कांद्याबाबत दोघांमध्ये व्यवहार झाला. २७ रुपये किलो या दराने व्यवहार ठरल्यानंतरही संबंधिताने २० रुपये किलो या दरानेच ५८ हजार ५०० रुपये दिले जाईल, अशी तोंडी हमी दिली. येथील एका गुदामात माल उतरविण्यात आला. बिलही बनविण्यात आले. मात्र पैसे मिळाले नव्हते. 

व्यवहार होऊन कांदा दिल्यानंतर श्री. साबळे यांनी व्यवहारापोटी शेतीमालाचे पैसे मागितले असता हा संशयित साबळे यांच्या वाहनात बसला व पुन्हा मालेगाव स्टॅण्ड येथे त्यांना घेऊन आला. त्या ठिकाणी साबळे दांपत्याला चहा पाजला. नंतर मोबाइलवर बोलायचे नाटक करून त्याने पळ काढला. शेतकऱ्याने फोन केला. मात्र व्यापाऱ्याचा मोबाइल बंद लागल्याने साबळे यांनी पुन्हा मार्केटमध्ये धाव घेतली. मात्र तोपर्यंत मालही गायब होता. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साबळे यांनी रात्री उशिरा (ता.१९) पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

तोतया व्यापाऱ्याने शेतकऱ्यास २९ क्विंटल ४५ किलो कांद्याची रक्कम न देता माल घेऊन फरारी झाला. यासंदर्भात पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित इजियाज अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कासर्ले तपास करीत आहेत.

फसवणूक प्रकरणी महानिरीक्षकांचे पंचवटी पोलिसांना निर्देश
पीडित कांदा उत्पादक शेतकरी दांपत्याने शनिवारी (ता. २१) विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांची भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. डॉ. दिघावकर यांनीही पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांना दूरध्वनी करत याप्रकरणी लवकरात लवकर तपास करण्याच्या सूचना केल्या.


इतर अॅग्रो विशेष
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
संत्र्याची शेतातच लिलावाने विक्री;...परभणी ः जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू)...
नांदेडमध्ये ३४ लाखांचा शेतीमाल घेऊन...नांदेड : शेतीमालाला बाजारात जास्तीचा भाव देतो असे...
राज्यातील मातीत गंधक, जस्त, लोह,...अकोला ः हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या...
जमीन सुपीकता निर्देशांक आता एका क्लिकवरपुणे ः शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी...
शेतकऱ्याची व्याख्या, वर्गीकरणाची गरज ः...पुणे ः शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक धनदांडगे...
टॉवरचा भुलभुलैया, लाखोंचा गंडाकऱ्हाड ः शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा...
आज पुन्हा चर्चा; मंगळवारी भारत बंदनवी दिल्ली ः केंद्राचे तीनही कृषी कायदे...
बुरेवी चक्रीवादळ निवळू लागले; थंडी...पुणे ः बुरेवी चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र...
माती जीवंत ठेवाआज पाच डिसेंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न व...
‘आत्मनिर्भर’ : एक उलटा प्रवासनाणेनिधीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या इकॉनॉमिक...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा ‘...शिवणी (जि. जळगाव) येथील पद्मालय शेतकरी उत्पादक...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...