agriculture news in Marathi, Onion fluctuations in the Sinnar market committee | Agrowon

सिन्नर बाजार समितीत कांदा आवकेत चढउतार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

नाशिक (प्रतिनिधी) : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीसह नांदूरशिंगोटे आणि पांढुर्ली उपबाजारात कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. नांदूरशिंगोटे उपबाजारात गेल्या आठवड्यापर्यंत कांद्याची आवक ६ ते ७ हजार क्विंटल होती. ती आता ३ हजार क्विंटलपर्यंत आली आहे. आवक निम्म्यावर घसरली आहे. असे असले तरी दरात सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचेच रोजच्या लिलावावरून दिसून येत आहे.

नाशिक (प्रतिनिधी) : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीसह नांदूरशिंगोटे आणि पांढुर्ली उपबाजारात कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. नांदूरशिंगोटे उपबाजारात गेल्या आठवड्यापर्यंत कांद्याची आवक ६ ते ७ हजार क्विंटल होती. ती आता ३ हजार क्विंटलपर्यंत आली आहे. आवक निम्म्यावर घसरली आहे. असे असले तरी दरात सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचेच रोजच्या लिलावावरून दिसून येत आहे.

नांदूरशिंगोटे आणि पांढुर्ली उपबाजारात कांदा गोणीच्या स्वरूपात लिलाव होतात. पांढुर्लीतही गोणी कांद्याची आवक निम्म्यावर आली आहे. सिन्नर, दोडी आणि नायगाव उपबाजारातही असेच दर असल्याने आवक मंदावल्याचे चित्र आहे. मे महिन्याच्या सुरवातीला कांद्याचे बाजारभाव १०० ते १००१ रुपये प्रतिक्विंटल होते तर सरासरी भाव ८०० रुपये होते. सोमवारी (ता. १३) कांद्याचे भाव १०० ते ११२५ रुपये होते तर सरासरी भाव ८२५ रुपये होते. चालू वर्षी मे महिन्यात कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा होती. मात्र, उन्हाळ कांद्याच्या भावात समाधानकारक वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा साठवण्यावर भर दिला आहे. परिणामी, सिन्नर बाजार आवारात कांद्याची भावात चढउतार असल्याने आवकेतही चढउतार होत असल्याचे दिसून आले.

मागील वर्षांपासून कांद्याला समाधानकारक दर मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी उत्पादन घेऊनही तोट्यात आहेत. त्यामुळे कांदा लागवड व काढणीपर्यंत केलेला खर्चही वसूल झालेला नाही. अनेक शेतकऱ्यांना बाजारात आणण्यासाठी स्वमालकीचे वाहन नसल्याने कांदा वाहतूक करणे परवडत नाही. त्यामुळे हा अतिरिक्त खर्च उत्पादकाला करावा लागत आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी मागील वर्षाच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी यंदा कांदा साठवणुकीस पसंती दिली जात आहे. आधुनिक कांदा चाळी उभारून शेतकऱ्यांनी त्यात कांदा साठविला आहे. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे कांदा साठवून ठेवल्यानंतर तो टिकविण्यासाठी बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे. 

इतर बातम्या
मराठवाड्यात २७१ मंडळांमध्ये बरसला पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...
कांदा दरस्थिती आढाव्यासाठी केंद्राचे...नाशिक : कांदा दर, आवक स्थितीचा आढावा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...