सातगाव पठार भागात कांदा, लसूण लागवड सुरू

सातगाव पठार भागात कांदा, लसूण लागवड सुरू
सातगाव पठार भागात कांदा, लसूण लागवड सुरू

सातगाव पठार, जि. पुणे ः सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात बटाटे काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा व लसूण पिकांच्या लागवडीस सुरवात केली आहे. 

चालू वर्षी रब्बी हंगामासाठी पाऊस चांगला झाल्याने सातगाव पठार भागातील कांदा, लसूण, भाजीपाल्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. कांदा पीक शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न देते. परंतु उत्पादनाची हमी देता येत नाही. त्यामुळे कांद्यापासून आर्थिक उत्पन्न जास्त प्रमाणात मिळेलच याची शाश्वती नसते. कांदा लागवडीसाठी काही शेतकरी आपल्या शेतात रोपे तयार न करता. दुसरीकडून विकत रोपे घेतात. 

या रोपांच्या खर्चाबरोबरच भारनियमन व मजुरी यामुळे भांडवली खर्चात आणखीन भर पडते. कांदा लागवडीदरम्यान सऱ्यांमध्ये सतत पाण्याची आवश्‍यकता असते. सध्या वारंवार होत असलेल्या भारनियमनामुळे पाणी घेणे अडचणीचे झाले आहे. त्यावर उपाय म्हणून कांदा लागवड चालू असताना डिझेल इंजिन भाड्याने आणावे लागते. एका दिवसाला डिझेल इंजिनचे भाडे डिझेलसह ४०० ते ५०० रुपये द्यावे लागते. तसेच मजुरांची कमतरता असल्याने मिळालेल्या मजुरांना २५० ते ३०० रुपये रोज द्यावा लागत असल्याचे शेतकरी रमेश तोत्रे यांनी सांगितले. 

दरम्यान, कांदा पिकाबरोबरच या भागातील बहुतांश शेतकरी लसूण पिकाचे उत्पादन घेतात. चालू रब्बी हंगामात लसूण पिकाच्या लागवडीचे देखील नियोजन करण्यात शेतकरी मग्न आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com