agriculture news in Marathi onion got 80 rupees per kg in Otur Maharashtra | Agrowon

ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८० रुपये दर 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या ओतूर उपबाजारात रविवारी (ता.१८) कांद्याला दहा किलोला सर्वाधिक ८२१ रुपये दर मिळाल्याचा उच्चांक झाला आहे. 

पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या ओतूर उपबाजारात रविवारी (ता.१८) कांद्याला दहा किलोला सर्वाधिक ८२१ रुपये दर मिळाल्याचा उच्चांक झाला आहे. ओतूर उपबाजारात २१ हजार ८०१ पिशव्या कांद्याची आवक झाली होती. यावेळी सर्वोत्तम कांद्याला ८२१ रुपये दर मिळाला तर सरासरी दर ६०० रुपये मिळाल्याची माहिती बाजार समिती सभापती संजय काळे यांनी दिली. 

यंदा सततच्या पावसाचा फटका कांदा पिकाला बसला असून, कांदा लागवडी दरम्यान झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने कांदा रोपवाटीकांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे कांद्याच्या लागवडीमध्ये घट झाली असून, चाळींमधील कांदा देखील मोठ्या प्रमाणावर भिजल्याने कांद्याची बाजारामधील आवक घटत गेली, परिणामी कांदा टंचाई निर्माण झाल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. तसेच नवीन कांद्याच्या आवकेला देखील आणखी दोन महिन्यांचा विलंब असणार असल्याने कांद्याची दर चढेच राहण्याचा अंदाज काळे व्यक्त केला आहे. 

दरम्यान पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील रविवारी (ता.१८) कांद्याचे दर दहा किलोला ६३० रुपयांपर्यंत वाढले होते. बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याची अवघी ३०० गोणी आवक झाली होती.तर नवीन कांद्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली होती. यावेळी नवीन कांद्याला दहा किलोला ३०० ते ५००तर जुन्या कांद्याला ५०० ते ६३० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. 

ओतुर उपबाजारात मिळालेला दर 

१ नंबर ७०० ते ७५० 
२ नंबर ५५० ते ७०० 
३ नंबर ४०० ते ५५० 
४ नंबर २०० ते ४०० 

इतर अॅग्रो विशेष
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...