तीनच दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमागे ५० हजारांचा भुर्दंड

सोमवारी ४२३०, बुधवारी ३४८१ आणि गुरुवारी २५०१..अन् शुक्रवारी २४३६ चारच दिवसांत लाल कांद्याच्या दरात इतकी तफावत झाल्याने शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
तीनच दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना  ट्रॅक्टरमागे ५० हजारांचा भुर्दंड To onion growers in just three days Rs 50,000 behind the tractor
तीनच दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना  ट्रॅक्टरमागे ५० हजारांचा भुर्दंड To onion growers in just three days Rs 50,000 behind the tractor

नाशिक : सोमवारी ४२३०, बुधवारी ३४८१ आणि गुरुवारी २५०१..अन् शुक्रवारी २४३६ चारच दिवसांत लाल कांद्याच्या दरात इतकी तफावत झाल्याने शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी (ता. २६) भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमागे ५० हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. बुधवारी (ता. २४) लाल कांदा बाजारभावात सोमवारच्या (ता. २१) तुलनेत मोठी घसरण झाली होती. मात्र शुक्रवारीही लाल कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडले. गुरुवारी (ता. २५) येवल्यात लाल कांद्यास सरासरी दोन हजार रुपये बाजारभाव मिळाला. 

बुधवारी लाल कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण होताना गुरुवारच्या कांदा लिलावात काय चित्र समोर येते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.  सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात लाल कांद्यास प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते ४ हजार २३० (सरासरी ३६००), बुधवारी किमान १ हजार ते कमाल ३४८१ (सरासरी ३ हजार) रुपये तर शुक्रवारी ५०० ते २४३६ (सरासरी १९००) बाजारभाव मिळाला होता. गुरुवारी मात्र हे बाजारभाव मोठ्या प्रमाणात खाली आले. गुरुवारी ५० ट्रॅक्टर आणि ६०० रिक्षा पिकअपमधून सुमारे साडेसहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती.

या ठिकाणी लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान ८०० ते कमाल २५०१ (सरासरी २ हजार) रुपये, असा बाजारभाव मिळाला. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी लाल कांदा किमान बाजारभाव प्रतिक्विंटल २०० रुपयांनी, कमाल बाजारभाव ९८० रुपयांनी, तर सरासरी बाजारभाव हजार रुपयांनी खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली गेली. 

शेतकऱ्यांनी सोमवारी ट्रॅक्टरभर (सुमारे ३० क्विंटल) कांद्याचे १ लाख २५ हजार रुपये घरी नेले, तेथे शुक्रवारी शेतकऱ्यांना कोसळलेल्या बाजारभावामुळे सुमारे ५० हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला, केवळ ७५ हजारांवरच समाधान मानावे लागले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा चेहरा काळवंडला होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com