Agriculture news in marathi To onion growers in just three days Rs 50,000 behind the tractor | Page 2 ||| Agrowon

तीनच दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमागे ५० हजारांचा भुर्दंड

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

सोमवारी ४२३०, बुधवारी ३४८१ आणि गुरुवारी २५०१..अन् शुक्रवारी २४३६ चारच दिवसांत लाल कांद्याच्या दरात इतकी तफावत झाल्याने शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

नाशिक : सोमवारी ४२३०, बुधवारी ३४८१ आणि गुरुवारी २५०१..अन् शुक्रवारी २४३६ चारच दिवसांत लाल कांद्याच्या दरात इतकी तफावत झाल्याने शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी (ता. २६) भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमागे ५० हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. बुधवारी (ता. २४) लाल कांदा बाजारभावात सोमवारच्या (ता. २१) तुलनेत मोठी घसरण झाली होती. मात्र शुक्रवारीही लाल कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडले. गुरुवारी (ता. २५) येवल्यात लाल कांद्यास सरासरी दोन हजार रुपये बाजारभाव मिळाला. 

बुधवारी लाल कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण होताना गुरुवारच्या कांदा लिलावात काय चित्र समोर येते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. 
सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात लाल कांद्यास प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते ४ हजार २३० (सरासरी ३६००), बुधवारी किमान १ हजार ते कमाल ३४८१ (सरासरी ३ हजार) रुपये तर शुक्रवारी ५०० ते २४३६ (सरासरी १९००) बाजारभाव मिळाला होता. गुरुवारी मात्र हे बाजारभाव मोठ्या प्रमाणात खाली आले. गुरुवारी ५० ट्रॅक्टर आणि ६०० रिक्षा पिकअपमधून सुमारे साडेसहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती.

या ठिकाणी लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान ८०० ते कमाल २५०१ (सरासरी २ हजार) रुपये, असा बाजारभाव मिळाला. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी लाल कांदा किमान बाजारभाव प्रतिक्विंटल २०० रुपयांनी, कमाल बाजारभाव ९८० रुपयांनी, तर सरासरी बाजारभाव हजार रुपयांनी खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली गेली. 

शेतकऱ्यांनी सोमवारी ट्रॅक्टरभर (सुमारे ३० क्विंटल) कांद्याचे १ लाख २५ हजार रुपये घरी नेले, तेथे शुक्रवारी शेतकऱ्यांना कोसळलेल्या बाजारभावामुळे सुमारे ५० हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला, केवळ ७५ हजारांवरच समाधान मानावे लागले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा चेहरा काळवंडला होता. 


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...