Agriculture news in Marathi, Onion harvesting in Man taluka | Agrowon

माण तालुक्यात कांदा काढणी वेगात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

गोंदवले, जि. सातारा : निवडणुकीच्या सुगीतच शेतीची सुगी असल्याने उमेदवारांबरोबरच शेतकऱ्यांचीही धामधूम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. माण तालक्यात सध्या कांदा काढणी आणि काटणीच्या कामांना वेग आला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली असतानाच माणमध्ये शेतकऱ्यांनी मात्र, कांदा काढणी व काटणीसाठी हाताची भिंगरी केली आहे. सध्या कांद्याबरोबरच मतदारही चांगलाच भाव खात असल्याने चित्र आहे.

गोंदवले, जि. सातारा : निवडणुकीच्या सुगीतच शेतीची सुगी असल्याने उमेदवारांबरोबरच शेतकऱ्यांचीही धामधूम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. माण तालक्यात सध्या कांदा काढणी आणि काटणीच्या कामांना वेग आला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली असतानाच माणमध्ये शेतकऱ्यांनी मात्र, कांदा काढणी व काटणीसाठी हाताची भिंगरी केली आहे. सध्या कांद्याबरोबरच मतदारही चांगलाच भाव खात असल्याने चित्र आहे.

प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचारात गुंतला आहे. याच धामधुमीत मात्र, शेतकरीवर्ग शेती कामात गुंतला आहे. गेल्या तीन वर्षांत दुष्काळाविरुद्ध शेतकरी झगडत आहे. दुष्काळी परिस्थितीतही मिळेल त्या पाण्यावर शेतकऱ्यांनी शेती करण्याचा प्रयत्न केला. उरमोडीच्या पाण्यानेही कालव्यालगतच्या शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला. अनेकांनी नगदी पीक असणाऱ्या कांद्याची लागण मोठ्या प्रमाणात केली होती. या तीन महिन्यांच्या कांद्याची काढणी व काटणी सध्या सुरू आहे. 

कांदा काढणीसाठी पुरुषांपेक्षा महिला शेतमजुरांची संख्या मोठी असून, एक पोते कांदा काटणीसाठी साठ ते सत्तर रुपये घेतले जात आहेत. मागणी वाढल्याने कांद्याला चांगला दर मिळत असून, व्यापारी जागेवरून कांदा उचलण्यासाठी गावोगावी फिरताना दिसत आहेत. व्यापारी प्रतिक्विंटल अडीच ते तीन हजार रुपये दर देत आहेत.

यंदा कांद्याला चांगला भाव मिळत असला तरी दुष्काळात पीक जोपासण्यासाठी झालेला खर्चही मोठा आहे.
- दत्ता काशीद, शेतकरी, नरवणे


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...