Agriculture news in marathi Onion harvesting will start soon in Khandesh | Agrowon

खानदेशात कांदा काढणी लवकरच सुरू होणार 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 मार्च 2021

खानदेशात कांद्याची लागवड सुमारे १८ हजार हेक्टरवर झाली आहे. काढणी लवकरच सुरू होईल. परंतु कांद्याचे दर गेल्या चार-पाच दिवसांपासून सतत घसरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. 

जळगाव : खानदेशात कांद्याची लागवड सुमारे १८ हजार हेक्टरवर झाली आहे. काढणी लवकरच सुरू होईल. परंतु कांद्याचे दर गेल्या चार-पाच दिवसांपासून सतत घसरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. 

कोरोना व अधिक आवक यामुळे दरांवर परिणाम झाला आहे. कांदा लागवडीसाठी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. धुळ्यात लागवड अधिक असते. तेथे सुमारे १० हजार हेक्टरवर लागवड झाल्याचा अंदाज आहे.

नंदुरबारातही सुमारे दीड हजार हेक्टर आणि जळगाव जिल्ह्यात सुमारे सात हजार हेक्टरवर कांदा लागवड झाल्याचा अंदाज आहे. धुळ्यातील लागवड बऱ्यापैकी असल्याने लागवडीत घट झालेली नसल्याची माहिती आहे. कांदा लागवड डिसेंबरच्या सुरवातीला सुरू झाली. जळगाव जिल्ह्यात सुमारे सहा ते साडेसहा हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित होती. जळगाव जिल्ह्यात चोपडा, धरणगाव, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, जामनेर, जळगाव या तालुक्यांत लागवड झाली आहे. कांद्याचे दर बऱ्यापैकी मिळाल्याने शेतकऱ्यांनी लागवड केली होती. 

धुळ्यातील शिंदखेडा, साक्री भागात लागवड अधिक आहे. धुळे तालुक्यातील कापडणे, देवभाने, लामकानी, कुसुंबा आदी भागातही चांगली लागवड झाली आहे. कांद्याची लागवड यंदा खर्चिक ठरली आहे. कारण बियाण्याचे दर यंदा प्रतिकिलो चार हजार रुपयांपर्यंत होते. महागडे बियाणे व लागवड खर्च यामुळे खर्च अधिकचा आला आहे.

लागवडीसाठी एकरी चार ते साडेचार हजार रुपये एवढा खर्च आला आहे. लागवडीला डिसेंबरच्या अखेरीस वेग आला. लाल कांद्याची लागवड अधिक झाली आहे. नंदुरबारात अक्कलकुवा, शहादा भागात पांढऱ्या कांद्याची लागवड काही कंपन्यांच्या मदतीने झाली आहे. यंदा अतिपावसात कांद्याचे खरिपात नुकसान झाले. बियाणे महाग होते, यामुळे लागवडीवर परिणाम होईल, अशी शक्यता होती.

परंतु लागवड स्थिर राहिली आहे. आता आगाप लागवडीच्या कांद्याची काढणी येत्या १५ दिवसांनंतर सुरू होईल. तोपर्यंत दर आणखी कमी होतील, अशी स्थिती आहे. कारण कांदा लागवड स्थिर राहिली. त्यात कोरोनाचे संकट आहे.


इतर बातम्या
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
दिग्गज प्रस्थापितांमध्ये रंगणार ‘गोकुळ’...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
‘शेती’वरही निर्बंध; दुकाने फक्त 'या'...पुणे : कोरोना विषाणूच्या जीवघेण्या साथीला पायबंद...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
मोसंबीच्या वाण निवडीसाठी संशोधन...औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांना सध्या अस्तित्वात...
जगाची ‘फळांची करंडी’ होण्याची...पुणे ः ‘घरी ज्याच्या फळांची करंडी तोची असे खरा...
कोकणात बांधावरच्या पिकांची होणार...पुणे : कोकणातील दुर्लक्षित परंतु येत्या काळात...
विदर्भात आजपासून पावसाची शक्यतापुणे : विदर्भाच्या अनेक भागांत अंशतः ढगाळ...
राज्यात अद्याप ३६ कारखान्यांचा हंगाम...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात हुपरी (ता. हातकणंगले...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...