Agriculture news in marathi Onion incoming increase in Solapur after rise the rate in Solapur | Agrowon

सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत वाढ

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 डिसेंबर 2019

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ५) कांद्याच्या दराने या हंगामातील सर्वाधिक २० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतच्या दराचा उच्चांक केला. दुसऱ्या दिवसी शुक्रवारी (ता. ६) बाजाराला सुटी होती. पण, शनिवारी (ता. ७) बाजाराला सुरुवात झाली. पण कालची सुटी आणि दरवाढीचा परिणाम म्हणून की काय बाजारात कांद्याची आवक मोठ्याप्रमाणत वाढली. तब्बल ५०० हून अधिक गाड्या बाजाराच्या आवारात दाखल झाल्या.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ५) कांद्याच्या दराने या हंगामातील सर्वाधिक २० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतच्या दराचा उच्चांक केला. दुसऱ्या दिवसी शुक्रवारी (ता. ६) बाजाराला सुटी होती. पण, शनिवारी (ता. ७) बाजाराला सुरुवात झाली. पण कालची सुटी आणि दरवाढीचा परिणाम म्हणून की काय बाजारात कांद्याची आवक मोठ्याप्रमाणत वाढली. तब्बल ५०० हून अधिक गाड्या बाजाराच्या आवारात दाखल झाल्या.

विशेषतः शेजारील कर्नाटक आणि आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांतूनही कांद्याच्या आवकेचे प्रमाण अधिक राहिले. परिणामी, या आवकेचा दरावर परिणाम झाला. शनिवारी प्रतिक्विंटलला सर्वाधिक १५ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.  

सोलापूर बाजार समिती गेल्या पंधरवड्यापासून कांद्याच्या उच्चांकी दरामुळे चर्चेत आहे. आधी ८ हजार, ९ आणि १५ हजार रुपये अशा चढत्या क्रमाने बाजारात कांद्याला दर मिळत असल्याने बाजार चांगलाच तेजीत आहे. गुरुवारी (ता. ५) बाजाराने आणखीन एक इतिहास घडवला. यादिवशी  प्रतिक्विंटलला तब्बल २० हजार रुपयांचा दर कांद्याने मिळवला. त्यामुळे सर्वंच बाजारांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे दोनच दिवसांत अनेक भागांतून कांदा सोलापूर बाजार समितीकडे वळला. 

शेजारच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणातूनही कांदा आल्याचे सांगण्यात आले. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी (ता. ६) बाजाराला सुटी होती. पण शनिवारी मात्र ही आवक वाढली. तब्बल ५०० गाड्यांपर्यंत ही आवक पोचली. तरीही बाजार काहीसा तेजीचाच राहिला.

शनिवारी कांद्याला किमान २०० रुपये, सरासरी ५५०० रुपये आणि सर्वाधिक १५ हजार रुपये इतका दर मिळाला. बाजार समितीतील अलीकडच्या या तीन दिवसांत केवळ कांद्याच्या वाढत्या दरामुळे बाजार समितीची उलाढालही वाढली आहे. केवळ या तीन दिवसांत कांद्याची उलाढाल ३८ कोटी २० लाख ७८ हजाराच्या घरात पोचली आहे.

आज रविवारीही सुरू राहणार बाजार

सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या लिलावाला रविवारी साप्ताहिक सुटी असते. त्यामुळे बाजार बंद असतो. पण कांद्याची वाढती आवक आणि वाढलेले दर विचारात घेऊन पणन संचालकांनी रविवारीही बाजार सुरू ठेवण्याची सूचना बाजार समिती प्रशासनाला केली आहे. त्यामुळे आज रविवारी (ता. ८) कांद्याचे लिलाव नेहमीप्रमाणे होतील. याचा फायदा दूरवरुन आलेल्या शेतकऱ्यांना होणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...