जळगाव बाजारात कांदा कमाल २८०० रुपये

 Onion in Jalgaon Market Max 2800 rupees
Onion in Jalgaon Market Max 2800 rupees

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दर्जेदार लाल कांद्याचे दर २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. आवक स्थिर असून, दरात मागील पंधरवड्यापासून सतत चढउतार सुरू आहे. सर्वाधिक प्रतिदिन ७०० क्विंटल आवक जळगाव बाजार समितीत झाली आहे. 

जिल्ह्यात कांद्यासाठी चाळीसगाव, किनगाव (ता. यावल), अडावद (ता. चोपडा) व जळगाव  बाजार समिती कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. कांद्याची सर्वाधिक आवक जळगाव बाजारात होत असते. सध्या जळगाव व अडावद येथील बाजारात आवक सुरू आहे. चाळीसगाव व किनगाव येथील बाजारातील आवक घटली आहे.

आठवड्यातून दोन तीन दिवसच किनगावच्या बाजारात कांद्याची आवक होते. जळगावच्या बाजारात रोज आवक होत असून, गेल्या आठवड्यात प्रतिदिन ७०० क्विंटल आवक झाली. दर २००० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाली. आवक मागील हंगाम किंवा वर्षाच्या तुलनेने निम्मेपेक्षा अधिक कमी आहे. दरात मात्र चढउतार सुरू आहे.

नोव्हेंबरमध्ये कांद्याचे दर साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. परंतु डिसेंबर व जानेवारीमध्ये दरात चढउतार झाले. दर टिकून न राहिल्याने शेतकऱ्यांनी साठविलेल्या कांद्याचा हवे तसे दर मिळाले नाहीत. आवक मात्र डिसेंबरच्या मध्यानंतर वाढली. आवक सध्या भुसावळ, यावल, चोपडा, जामनेर, औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड, जालना, बुलडाणा आदी भागांतून होत आहे.

पांढऱ्या कांद्याची कुठलीही आवक जळगावच्या बाजारात मागील आठवड्यात झाली नाही. आवक पुढेही कमीच राहू शकते. कारण, रब्बीमधील कांद्याची काढणी मार्चमध्ये सुरू होईल. तोपर्यंत आवक कमीच राहू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. 

दरांमुळे लागवड वाढली

कांद्याचे दर नोव्हेंबर व डिसेंबरच्या मध्यापर्यंत टिकून होते. यामुळे कांद्याची लागवड जिल्ह्यात वाढली असून, ती सुमारे साडेचार हजार हेक्‍टरपर्यंत पोचली आहे. ही लागवड चोपडा, जामनेर, एरंडोल, पाचोरा, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, भडगाव आदी भागांत अधिक झाली आहे, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com