खानदेशात कांद्याच्या आवकेत वाढ

जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या आवकेत वाढ होत आहे. आवक वाढेल तशी कोरोनाची समस्याही तीव्र होत आहे.
Onion in Khandesh Increase in incoming
Onion in Khandesh Increase in incoming

जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या आवकेत वाढ होत आहे. आवक वाढेल तशी कोरोनाची समस्याही तीव्र होत आहे. जळगाव जिल्ह्यात जनता कर्फ्यू सुरू असल्याने बाजार व्यवस्थेला फटका बसला आहे. कांद्याच्या दरावर दबाव वाढला आहे.  दर प्रतिक्विंटल ७०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. 

कांदा दरात गेल्या २० ते २२ दिवसात क्विंटलमागे किमान एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. लाल कांद्याचे दर गेल्या महिन्याच्या मध्यात किमान ८०० व कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर होते.

कांद्याला उठावही बऱ्यापैकी होता. परंतु कांद्याची आवक मागील पाच ते सात दिवसात धुळे, जळगाव, पिंपळनेर (ता.साक्री) येथील बाजारात वाढली आहे. यातच जळगाव, धुळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज (ता. १४) हा कर्फ्यू संपणार आहे. याचा कांदा दरावर परिणाम झाला आहे. शहरांमधील हॉटेल, खानावळी बंदावस्थेत आहेत. यामुळे कांद्याची मागणी शहरातील बाजारात कमी झाल्याची स्थिती आहे. जळगाव येथील बाजारात कांद्याची आवक या आठवड्यात प्रतिदिन ५०० क्विंटल राहिली. धुळ्यातही प्रतिदिन सरासरी ८०० क्विंटल आवक झाली. 

पांढऱ्या कांद्याची कमी आवक

यंदा कांद्याची लागवडही अधिक आहे. पुढे आवक आणखी वाढेल. यात कोरोना व बाजारपेठेसंबंधीची समस्या कमी झाल्यास उठाव वाढेल. परिणामी दरावरील दबाव दूर होवू शकेल, असा मुद्दा खरेदीदार उपस्थित करीत आहेत. पांढऱ्या कांद्याची आवक बाजारात कमी आहे. फक्त जळगाव व धुळे येथील बाजारात पांढऱ्या कांद्याची किरकोळ स्वरुपातील आवक होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com