agriculture news in marathi Onion in Khandesh Prices continue to fall | Agrowon

खानदेशात कांद्याच्या दरातील घसरण सुरूच

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 मार्च 2021

जळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या आठवडाभरापासून सतत घसरण सुरू आहे. कमाल दरात क्विंटलमागे ६०० रुपयांची घसरण झाली आहे.

जळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या आठवडाभरापासून सतत घसरण सुरू आहे. कमाल दरात क्विंटलमागे ६०० रुपयांची घसरण झाली आहे. किमान ८०० व कमाल २४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर कांद्याला मिळत आहे. 

कांद्याचा सरासरी दरही दरातील घसरणीने कमी झाला आहे. सध्या सरासरी दर १८०० रुपये प्रतिक्विंटल, एवढा आहे. १५ दिवसांपूर्वी लाल कांद्याचा किमान दर १००० व कमाल दर ३४०० रुपये प्रतिक्विंटल, एवढा होता. त्यात हळूहळू घसरण सुरू झाली. कांद्याच्या आवकेत वाढ होईल, असे संकेत बाजारातून मिळत असतानाच कोरोनामुळे खानदेशात आठवडी बाजार बंद झाले. 

जळगाव जिल्ह्यात ६ मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद आहेत. बाजार समित्यांमध्ये भाजी, फळे मार्केट यार्डात सोशल डिस्टन्सिगचे पालन केले जात नसल्याचे कारण सांगून कारवाईदेखील झाली. ही कारवाई जळगाव येथे एकदा करण्यात आली. अडतदार, व्यापारी यांना गर्दी न होवू देण्याची ताकीद देण्यात आली. आठवडी बाजार बंद असल्याने बाजारात इतर भाजीपाल्यासह कांदा दरावरही दबाव आला. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. 

आगाप लागवडीच्या कांद्याची काढणी जळगाव, धुळे जिल्ह्यात काही गावांमध्ये सुरू झाली आहे. 

पणन व्यवस्था आक्रसली

काढणीनंतर १७ ते २० दिवसात कांद्याची बाजारात विक्री केली जाते. यातच खानदेशातील पणन व्यवस्था कोरोनामुळे आक्रसली आहे. अशा स्थितीत कांदा उत्पादकांना मोठे नुकसान सहन करावे लागेल, असे दिसत आहे. कांद्याचे सरासरी दर सध्या प्रतिक्विंटल १८०० रुपये आहेत. त्यात पुढे आणखी घसरण होऊ शकते, असे सांगितले जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात एक लाख १७ हजार टन...परभणी ः ‘‘जिल्ह्याला यंदाच्या (२०२१) खरीप...
मोहोळमध्ये खरेदी, विक्रीदारांना कोरोना...मोहोळ, जि. सोलापूर ः ‘‘मोहोळ येथील दुय्यम निबंधक...
अडीच लाख क्विंटल चंद्रपुरात धान खरेदीचंद्रपूर : शासनाने या वर्षी हमीभावा सोबतच सातशे...
‘पोकरा’चे सुमारे १४ कोटींचे अनुदान...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील वसमत तालुक्यात...
नाशिकमध्ये लोकसहभागातून 'कोरोनामुक्त...नाशिक : ‘‘कोरोनाचा ग्रामीण भागात वाढलेला...
दर्जेदार शिवभोजन थाळीचे वितरण करा : ...मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांच्या...
भंडाऱ्यातील ६३ प्रकल्प गाठत आहेत तळभंडारा : सरासरी बरसलेला मॉन्सून, त्यानंतर अवकाळी...
खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्यास गळतीबाजारभोगाव, जि. कोल्हापूर : जांभळी नदीवरील...
शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीला प्रतिसाद...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
बुलडाण्यात दूध संकलन, वितरणाच्या वेळेत...बुलडाणा ः कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी...
पुणे विद्यापीठात उभारणार ‘बांबू पार्क’ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच...
सातबारासह कागदपत्रे घेऊन तलाठी...पातुर्डा, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळवण्यासाठी...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
कृषी विभागात कोरोनामुळे आत्तापर्यंत २८...पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गेल्या काही...
‘पंदेकृवि’ने दीक्षान्त सोहळा पुढे...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने...
कुर्जा खरेदी केंद्रावर धान मोजणीविना...भंडारा : पवनी तालुक्यातील कुर्जा येथे अनेक...
कापूस पिकासाठी यंत्रमानव ठरणार वरदान ः...अकोला ः देशांतर्गत कापूस लागवडीचे क्षेत्र १२९ लाख...
कृषी विभागातील पाच पुरस्कार्थींचे कौतुक पुणे : राज्याच्या कृषी खात्यात उल्लेखनीय कामे...
विमा उतरवा, अन्यथा बाजार समित्या बंद...पुणे/नाशिक ः शेतकरी, कामगार, राज्य सरकारचे सर्व...
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...