Agriculture news in marathi Onion in Khandesh is stable; Price fluctuations | Agrowon

खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 जानेवारी 2020

जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर आहे. आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. दरात मात्र चढउतार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर आहे. आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. दरात मात्र चढउतार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

ऑक्‍टोबरमध्ये लागवडीच्या कांद्याची काढणी काहीशी उशिराने झाली. या कांद्याची साठवणूक काही शेतकऱ्यांनी करून ठेवली होती. त्याची आवक सुरू आहे. जळगाव, धुळे, चाळीसगाव, साक्री (जि.धुळे), अडावद (ता.चोपडा), किनगाव (ता.यावल) येथील बाजारात कांद्याची आवक स्थिर आहे. या बाजारांमध्ये मिळून रोज सरासरी पाच हजार क्विंटल कांद्याची आवक मागील आठवडाभरात झाली आहे. सर्वाधिक आवक साक्री, जळगाव, अडावद, धुळे येथील बाजारात होत आहे. तर किनगाव, चाळीसगाव बाजारातील आवक कमी झाली आहे. मागील वर्षी जळगावच्या बाजारात डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यात पांढऱ्या कांद्याचीदेखील आवक होत होती. 

यंदा पाढऱ्या कांद्याची आवक नगण्य अशीच आहे. लाल कांद्याला जळगावच्या बाजारात मागील १० ते १२ दिवसांपासून प्रतिक्विंटल १८०० ते ३५०० रुपये दर मिळत आहे. नोव्हेंबरमध्ये दर नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. दर हवे तसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. परंतु कांद्याची १० ते १५ दिवसांपेक्षा अधिक वेळ साठवणूक करता येत नसल्याने त्याची विक्री शेतकरी बाजारात करीत आहेत. 

कांद्याची आवक औरंगाबाद, जालना, बुलडाण्यासह जळगाव, चोपडा, भुसावळ, यावल, धुळे, पाचोरा आदी भागातून होत आहे. काही शेतकरी हमीचे दर मिळतील, यासाठी कांद्याची पाठवणूक मध्य प्रदेशातील बडवानी, इंदूर व नाशिक जिल्ह्यातील लासलगावच्या बाजारात करीत आहेत. परंतु तेथेही अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती आहे. मध्य प्रदेशातही कांद्याची तेथील स्थानिक भागातून आवक वाढली आहे, असे सांगण्यात आले. 


इतर बाजारभाव बातम्या
परभणीत काकडी ५०० ते ८०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात ज्वारी ११५० ते ४००० रुपये...पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची १८७५ ते २८१०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२५...
नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरात घट नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरला गवार, शेवग्याच्या दरात तेजी कायम नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात कांदा २०० ते २५०० रुपये क्विंटललासलगावात १००० ते २२११ रुपये दर नाशिक :...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते...परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते ३५००...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
जळगावात गवार १८०० ते ३८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....