Agriculture news in marathi, Onion of 'Lasalgaon' Place on the mail envelope | Page 3 ||| Agrowon

'लासलगाव'च्या कांद्याला टपाल पाकिटावर स्थान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

नाशिक : कांदा पिकासाठी लासलगाव परिसराची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. लासलगाव परिसरातील कांद्याचे चव, रंग व वास यास वेगळेपण आहे. त्यामुळे त्यास भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

नाशिक : कांदा पिकासाठी लासलगाव परिसराची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. लासलगाव परिसरातील कांद्याचे चव, रंग व वास यास वेगळेपण आहे. त्यामुळे त्यास भौगोलिक मानांकन मिळाले आहे. याचा गौरव करण्यासाठी टपाल विभागाच्या वतीने ‘लासलगाव प्याज’ या विशेष टपाल पाकिटाचे अनावरण नुकतेच करण्यात आले.  

जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या कांद्याला अजून आंतरराष्ट्रीय स्थळावर ऐतिहासिक व पारंपरिक मूल्य प्राप्त व्हावे, जागतिक स्तरावर हा कांदा पोचावा, या साठी तसेच हा वारसा जतन करण्यासाठी भारतीय टपाल विभागाने पुढाकार घेत ''लासलगाव प्याज'' हे विशेष टपाल पाकीट काढले आहे, असे मालेगाव पोस्ट विभागाचे अधीक्षक नितीन येवला यांनी अनावरणप्रसंगी सांगितले.

लासलगाव पोस्ट कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात विशेष टपाल पाकिटाचे अनावरण लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, मालेगाव पोस्ट विभागाचे अधीक्षक नितीन येवला, लासलगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा, बळीराजा गटाचे अध्यक्ष राहुल पाटील, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, लासलगावचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल वाघ, कांदा व्यापारी हेमंत रांका उपस्थितीत होते. 


इतर बातम्या
शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची... पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल...
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात...नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६...
प्रकल्पग्रस्तांचे अर्ज प्रलंबित ठेवू...अमरावती : सिंचन प्रकल्पांची निर्मिती होत असताना...
जिनिंग प्रेसिंग कारखाने खानदेशात धडधडू...जळगाव ः खानदेशात कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग...
अकोल्यातील सिंचन प्रकल्पांच्या...अकोला ः जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची देखभाल...
सांगली जिल्ह्यातील थकबाकीमुक्तीत ५५...सांगली ः ‘‘कृषिपंपांच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
दोन लाख ९५ हजार टन खतांचे आवंटन मंजूरऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
दोन लाख ३८ हजार खातेदारांचे आधार...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
ग्रामबीजोत्पादनातून हरभरा, गहू...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
जुन्नर बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल...जुन्नर, जि. पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाच्या...
जळगाव जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांना...जळगाव : जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत झालेल्या...
नगर जिल्ह्यात सव्वानऊ हजार शेतकऱ्यांचे...नगर : जिल्ह्यात तब्बल दोन हजार ६३५ शेतकऱ्यांनी...
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...