पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला सुरू होणार

पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला सुरू होणार
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला सुरू होणार

पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर प्रत्येक शेतकऱ्यास हिशेबपट्टी द्यावी, कच्ची पावती दिल्यास आठ दिवस लिलावातील बोली बंद केली जाईल, कांदा खरेदीनंतर शेतकऱ्याला दिलेला धनादेश वटला नाही, तर लिलावात सहभाग घेता येणार नाही. तसेच २ मार्चला कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय साक्री (जि. धुळे) बाजार समितीने घेतले आहेत.  येथील उपबाजार समितीत व्यापाऱ्यांसमवेत भुसार व कांदा मार्केट सुरू करण्यासंदर्भात सचिव एस. एन. मोरे यांच्या उपस्थितीत बैठकीत हा निर्णय झाले. बैठकीत शेतीमालाचे रोख पैसे द्यावा, अचानक मार्केट व लिलाव बंद पाडता येणार नाही, लिलाव संपेपर्यंत हजर राहावे, लायसेन्स कागदपत्रे सादर करावे, दरवर्षी लायसेन्स रिनिव्हल करावे आदी निर्णय झाले. या वेळी प्रभाकर कोठावदे, हेमंत कोठावदे, दिलीप भदाणे, नीलेश चौधरी, अनिल कोठावदे, प्रवीण कोठावदे, दीपक भदाणे, अरुण नंदन, अमोल पाटील, भाऊसाहेब मराठे आदी व्यापारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपला माल उपबाजार समितीत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती पोपटराव सोनवणे, मंगलाबाई पाटील व संचालकांनी केले. सचिव अशोक मोरे, शाखाप्रमुख संजय बाबा यांनी बैठकीचे आयोजन केले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com