कांदा बाजारावर ‘कोरोना’चा परिणाम 

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आठ हमालांना, तसेच काही दिवाणजींना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीतर्फे घेण्यात आला आहे.
कांदा बाजारावर  ‘कोरोना’चा परिणाम Onion on the market The result of ‘corona’
कांदा बाजारावर  ‘कोरोना’चा परिणाम Onion on the market The result of ‘corona’

नगर : कोरोना व्हायरसची बाधा वाढत असल्याचा बाजार समित्यांतील कांदा लिलावावर परिणाम होताना दिसत आहे. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आठ हमालांना, तसेच काही दिवाणजींना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीतर्फे घेण्यात आला आहे. नगरलाही ९० टक्के लिलाव बंद आहेत. अन्य बाजार समित्यांतही कांदा लिलावावर परिणाम होताना दिसत आहे. 

नगर येथील बाजार समितीत सर्वाधिक कांद्याची आवक होत आहे. घोडेगाव, पारनेर बाजार समितीतही बऱ्यापैकी कांदा विक्रीला येतो. सध्या रब्बीतील कांदा काढणी सुरू असल्याने अवाक वाढत आहे. याच दरम्यान कोरोनाची बाधा होत असल्याने बाजार समित्यात कांदा लिलावावर परिणाम होत आहे.

पारनेर बाजार समितीत कांद्याची आवक वाढलेली असताना बाजार समितीतील आठ हमाल व काही दिवाणजींना कोरोनाची लागण झाली आहे. सुरक्षा उपाययोजना केल्या, तरीही कोरोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी बाजार समिती ३० एप्रिलपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे. 

सध्या अवकाळी पाऊस होत असल्याने व साठवण्याची सोय नसल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन येत आहेत. हमालांना एकत्रित काम करावे लागते. तसेच लिलाव करतानाही शेतकरी, व्यापारी, दिवाणजी यांचा सततचा संबंध येतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी लिलाव बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याने, हा निर्णय घेण्यात आला आहे.

आजपासून ३० एप्रिलपर्यंत लिलाव बंद ठेवण्यात येतील, असे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले. नगर बाजार समितीतही अवघे दहा टक्के लिलाव होत आहेत. अनेक हमाल, मापाडी कोरोनाबाधित झाले आहेत, त्यामुळे लिलाव करण्यासाठी खरेदीदार धजावत नसल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

प्रतिक्रिया

शेंडगेवाडी भिंगेवाडी परिसराला बुधवारी सायंकाळी गारपिटीमुळे डाळिंब, शेवगा आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.  -आनंदराव पाटील, शेतकरी, आटपाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com