Agriculture news in marathi Onion on the market The result of ‘corona’ | Agrowon

कांदा बाजारावर ‘कोरोना’चा परिणाम 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 एप्रिल 2021

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आठ हमालांना, तसेच काही दिवाणजींना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीतर्फे घेण्यात आला आहे.

नगर : कोरोना व्हायरसची बाधा वाढत असल्याचा बाजार समित्यांतील कांदा लिलावावर परिणाम होताना दिसत आहे. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आठ हमालांना, तसेच काही दिवाणजींना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीतर्फे घेण्यात आला आहे. नगरलाही ९० टक्के लिलाव बंद आहेत. अन्य बाजार समित्यांतही कांदा लिलावावर परिणाम होताना दिसत आहे. 

नगर येथील बाजार समितीत सर्वाधिक कांद्याची आवक होत आहे. घोडेगाव, पारनेर बाजार समितीतही बऱ्यापैकी कांदा विक्रीला येतो. सध्या रब्बीतील कांदा काढणी सुरू असल्याने अवाक वाढत आहे. याच दरम्यान कोरोनाची बाधा होत असल्याने बाजार समित्यात कांदा लिलावावर परिणाम होत आहे.

पारनेर बाजार समितीत कांद्याची आवक वाढलेली असताना बाजार समितीतील आठ हमाल व काही दिवाणजींना कोरोनाची लागण झाली आहे. सुरक्षा उपाययोजना केल्या, तरीही कोरोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी बाजार समिती ३० एप्रिलपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे. 

सध्या अवकाळी पाऊस होत असल्याने व साठवण्याची सोय नसल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन येत आहेत. हमालांना एकत्रित काम करावे लागते. तसेच लिलाव करतानाही शेतकरी, व्यापारी, दिवाणजी यांचा सततचा संबंध येतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी लिलाव बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याने, हा निर्णय घेण्यात आला आहे.

आजपासून ३० एप्रिलपर्यंत लिलाव बंद ठेवण्यात येतील, असे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले. नगर बाजार समितीतही अवघे दहा टक्के लिलाव होत आहेत. अनेक हमाल, मापाडी कोरोनाबाधित झाले आहेत, त्यामुळे लिलाव करण्यासाठी खरेदीदार धजावत नसल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

प्रतिक्रिया

शेंडगेवाडी भिंगेवाडी परिसराला बुधवारी सायंकाळी गारपिटीमुळे डाळिंब, शेवगा आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. 
-आनंदराव पाटील, शेतकरी, आटपाडी


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...