सांगलीत कांदा मार्केट मंगळवारी बंद

सांगलीत कांदा मार्केट मंगळवारी बंद
सांगलीत कांदा मार्केट मंगळवारी बंद

सांगली : सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापारी यांनी कांदा बाजारात सरकारी हस्तक्षेपाचा निषेध करण्यासाठी १५ ऑक्टोबरला कांदा, बटाटा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी बाजारात आणू नये, तसेच व्यापाऱ्यांनीही बंद पाळावा, असे आवाहन शेतकरी संघटना (शरद जोशी) आणि सांगली कांदा बटाटा व्यापारी संघटनेच्या वतीने केले आहे. मागील तीन वर्षे कांद्याचे अधिक उत्पादनामुळे दर पडल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यंदा सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात कांद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची शक्यता झाली होती. तथापि सरकारने कांद्याची निर्यात रोखण्यासाठी १९ जूनला १० टक्के निर्यात अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १३ सप्टेंबर २०१९ रोजी ८५० डॉलर प्रतिटन किमान निर्यात दर करून निर्यातीला प्रतिबंध निर्माण केला. नंतर ३ सप्टेंबर २०१९ रोजी कांद्याच्या निर्यातीवर थेट बंदी घातली. तरीही सरकारचे समाधान झाले नाही. देशांतर्गत कांदा व्यापारावर साठामर्यादा घातली. घाऊक व्यापाऱ्यांना फक्त ५० टन तर किरकोळ विक्रेत्यांना ५ टन साठा मर्यादा घातली.  इतकेच नव्हे तर बांगलादेशात चाललेल्या कांद्याचे ट्रक ७ दिवस रोखले. उत्तर प्रदेशात कांद्याचे ट्रक अडवले गेले. तर कांदा व्यापाऱ्यांवर धाडी घालण्याची भीती दाखवली गेली. या सर्व शेतकरी आणि व्यापारीविरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये नुकसान झाले. याच्या निषधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com