पुणे बाजार समितीत कांद्याची आवक वाढण्याची शक्यता

Onion may be increased in Pune market committee
Onion may be increased in Pune market committee

 पुणे : ‘‘गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ६) कांद्याची सुमारे २५० ट्रकची आवक झाली. या वेळी दहा किलोला १४० ते १७० रुपये दर होता. दिवसेंदिवस कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने निर्यातीला बंदी घातल्यास दर घसरण्याची शक्यता आहे. हेच दर १० रुपयांपर्यंत येतील’’, अशी शक्यता बाजार समितीमधील कांद्याचे प्रमुख आडतदार विलास रायकर यांनी व्यक्त केली आहे. 

केंद्र सरकार निर्यातबंदी घालण्याच्या विचार करत असून त्या पार्श्‍वभूमीवर कांद्याची आवक वाढत असल्याचा बाजार घटकांचा अंदाज आहे. पुणे बाजार समितीमध्ये दररोज सरासरी १०० ते १५० ट्रकची आवक होती. मात्र, गुरुवारी (ता. ६) विक्रमी २५० ट्रकची आवक झाली होती. केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. रविवारी (ता. २) २७ रुपयांपर्यंत दर असलेला कांदा गुरुवारी १७ रुपयांपर्यंत खाली आला आहे.

चार दिवसांतील आवक (क्विंटल), दर  

दिनांक आवक दर 
२१ ,९१८ १०००-२०००
२५,११९ १०००-२२०० 
२३,६०५ १०००-२५००
२९,६६९ १०००-२७००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com