कांद्याला हमीभावासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार

कांद्याला हमीभावासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार
कांद्याला हमीभावासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार

मुंबई : राज्यातील कांद्यांचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांद्याला हमी भाव द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करून कांद्याला हमीभाव मिळावा, यासाठीचा प्रस्ताव राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. राज्यातील कांदा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात पणनमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले, या वेळी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. पणनमंत्री श्री. देशमुख म्हणाले, शासन राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, कांद्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे. काही बाजार समित्या शेतीमालाचे दर उतरावेत म्हणून बाजार समित्या बंद ठेवत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी जर बाजार समित्या बंद ठेवत असतील, तर त्या बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांच्या खळ्यावर नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च घेऊ नये, असेही पणनमंत्री श्री. देशमुख यांनी बैठकीत सांगितले. कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळून दोन हजार रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्यावा, मार्च २०१८ पर्यंत सरसकट कर्जमाफी करुन येणाऱ्या हंगामासाठी शून्य टक्के व्याजदाराने सुलभ पीककर्ज उपलब्ध करून द्यावेत, दुष्काळाबाबत तातडीने मदत शेतकऱ्यांना करावी. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ हा अनुदान जाहीर केलेला कालावधी रद्द करून १ नोव्हेंबर ते ३१ मार्च २०१९ पर्यंत कांद्यास अनुदान जाहीर करावे. उन्हाळी कांदा खरेदीसाठी शासनाने हस्तक्षेप करावा, आदी मागण्या या वेळी शिष्टमंडळाने केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com