नगर जिल्ह्यात कांद्याला सरासरी ९०० रुपये दर

नगर ः जिल्ह्यात यंदा कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. सध्या बऱ्याच भागात कांदा काढणी सुरू आहे. त्यामुळे बाजारातही कांदा विक्रीला येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कांदा दरात घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
 Onion in Nagar district Average rate of Rs 900
Onion in Nagar district Average rate of Rs 900

नगर ः जिल्ह्यात यंदा कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. सध्या बऱ्याच भागात कांदा काढणी सुरू आहे. त्यामुळे बाजारातही कांदा विक्रीला येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कांदा दरात घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शनिवारी (ता.१९) झालेल्या लिलावात नगर बाजार समितीत लाल कांद्याला १०० ते १३०० व सरासरी ९०० रुपये, तर गावरान कांद्याला १०० ते १२०० व सरासरी ८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

जिल्ह्यात यंदा रब्बीत व उन्हाळी मिळून आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. रब्बीतील आगावू लागवड झालेल्या कांद्याची काढणी सुरु आहे. त्यामुळे नगरसह घोडेगाव, राहाता, राहुरी, कोपरगाव, अकोले, संगमनेर बाजार समितीत लाल कांद्याची तसेच गावरान कांद्याची आवक होत आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण होत आहे. 

नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत शनिवारी झालेल्या लिलावात एक नंबरच्या लाल कांद्याला ९०० ते १३००, दोन नंबरला ६०० ते ९००, तीन नंबरला ३०० ते ६००, व चार नंबरला १०० ते ३०० रुपयांचा दर मिळाला. गावराणच्या एक नंबरच्या कांद्याला १००० ते १२००, दोन नंबरला ६५० ते १ हजार, तीन नंबरला ३०० ते ६५०, चार नंबरला १०० ते ३०० रुपयांचा दर मिळाला. महिनाभरापूर्वी मिळणाऱ्या दराच्या तुलनेत सुमारे १५०० हजार रुपये प्रतिक्विंटलने दरात घसरण झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com