नगर जिल्ह्यात कांदा साडेपाच हजारांवर स्थिर

Onion in the Nagar district is stable at half-five thousand
Onion in the Nagar district is stable at half-five thousand

नगर ः गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले कांद्याचे दर गेल्या आठवडाभरापासून बऱ्यापैकी खाली आले आहेत. सध्या नगरसह अन्य बाजार समित्यांत कांद्याचे दर ५०० रुपयांपासून सुरू होत असून, साडेपाच हजारांवर स्थिर आहेत. शनिवारी (ता. ४) नगरला ५०० ते ५१०० रुपये दर मिळाला. पारनेर बाजार समितीतही शुक्रवारी प्रतिक्विंटलला ५०० ते ५५०० रुपये दर मिळाला.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस लिलाव होत असतात. नगर जिल्ह्यामधील बहुतांश बाजार समितीत गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे दर कमालीचे वाढले होते. घोडेगाव बाजार समितीत सर्वाधिक २१ हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. नगरसह अन्य बाजार समितीतही वीस हजारांपर्यंत दर गेले होते. 

गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले कांद्याचे दर गेल्या आठवडाभरापासून बऱ्यापैकी खाली आले आहेत. बहुतांश बाजार समितीत बाजार समित्याच कांद्याचे दर ५०० रुपयांपासून सुरू होत असून, पाच हजारावर स्थिर आहेत. शनिवारी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये ७५ हजार ७८७ गोण्याची आवक झाली. एक नंबर कांद्याला ४६०० ते ५५००, दोन नंबरच्या कांद्याला ३६०० ते ४५००, तीन नंबरच्या कांद्याला १६०० ते ३५०० व चार नंबरच्या कांद्याला ५०० ते १५०० रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला, असे नगर बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी सांगितले. 

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी कांद्याचे लिलाव होत असतात. शुक्रवारी वीस हजार गोण्याची आवक झाली आणि एक नंबरच्या कांद्याला ३५०० ते ५१००, दोन नंबरच्या कांद्याला २००० ते ३४०० आणि तीन नंबरच्या कांद्याला ५०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, असे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com