agriculture news in Marathi Onion net for onion exporters Maharashtra | Agrowon

कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ 

विनोद इंगोले
गुरुवार, 21 जानेवारी 2021

शेतकऱ्यांचा डाटा एका क्‍लिकवर उपलब्ध व्हावा याकरिता ‘ओनियन नेट’ कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतातून निर्यातीला चालना मिळावी, निर्यातीसाठी देशनिहाय कमाल कीडनाशक अंश मर्यादांबाबत (मॅक्झिमम रेसिड्यू लेव्हल) संदर्भाने जागृती वाढावी आणि अशा शेतकऱ्यांचा डाटा एका क्‍लिकवर उपलब्ध व्हावा याकरिता ‘ओनियन नेट’ कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

‘ओनियन नेट’ शनिवार (ता.१)पासून ‘अपेडा’च्या संकेतस्थळावर दिसायला सुरुवात झाली असून, महिनाभरात त्यावर नोंदणी सुरू होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. चीनमध्ये ९३०.२१ हेक्‍टर क्षेत्रावर कांदा होतो. त्यांची उत्पादकता २२ टन प्रति हेक्‍टर आहे. भारताचे कांद्याखालील क्षेत्र १०६४.०० हेक्‍टर, तर उत्पादकता अवघी १४ टन प्रति हेक्‍टर आहे. जागतिक उत्पादनाच्या तुलनेत चीनचा २६.९९ तर भारताचा १९.९० इतका वाटा आहे. 

भारताचे क्षेत्र विस्तारित असले, तरी उत्पादकता मात्र चीनपेक्षा कमी आहे. कांदा उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान व त्यानंतर अनुक्रमे बांगलादेश, व्हिएतनाम, रशिया, म्यानमार, ब्राझील, तुर्की यांचा क्रम लागतो. भारतात क्षेत्र आणि त्यामुळे उत्पादन वाढत असताना ‘अपेडा’ने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याकरिता ‘ओनियन नेट’चा पर्याय उपलब्ध केला आहे. नव्या वर्षापासून ‘ओनियन नेट’ पोर्टल ‘अपेडा’च्या संकेतस्थळावर दिसण्यास सुरुवात झाले. 

येत्या महिनाभरात तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून ते नोंदणीसाठी देखील उपलब्ध होणार आहे. देशाच्या एकूण लागवड क्षेत्राच्या तुलनेत महाराष्ट्रात कांदा लागवड क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे या भागातील निर्यातदारांना या माध्यमातून ‘अपेडा’ने संधी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे कांदा उत्पादकांचा डाटाबेस देखील एका क्लिकवर उपलब्ध होईल आणि ग्राहकांना देखील रसायन अवशेष मुक्त कांदा याद्वारे खरेदी करता येणार आहे. 

देशातील कांदा लागवड क्षेत्र (हेक्‍टर) 
२००६-०७ ः
७६८ 
२००७-०८ ः ८२१ 
२००८-०९ ः ८३४ 
२००९-१० ः ७५६ 
२०१०-११ ः १०६४ 

प्रतिक्रिया
देशाच्या एकूण निर्यातीच्या तुलनेत महाराष्ट्रातील निर्यात १५ ते १६ लाख टन इतकी आहे. तीन हंगामांत कांदा घेतला जातो. कीडनाशकांचा समंजस वापर व ‘एमआरएल’ ते पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा डेटा ‘अपेडा’च्या पुढाकाराने आता उपलब्ध होईल. निर्यातीला यामुळे चालना मिळणार असून, देशांतर्गत देखील दर्जेदार कांदा उत्पादकांची माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. 
- गोविंद हांडे, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार (निर्यात), राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 


इतर अॅग्रो विशेष
पाण्याच्या अंदाजपत्रकात पशुधनाचा विचार...भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी...
कोरोनामुळे अंतिम टप्प्यातील ऊस हंगाम...कोल्हापूर : राज्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात...
बेदाणा निर्यात अनुदान बंदचा उत्पादकांना...सांगली ः गतवर्षी देशातून बेदाण्याची सुमारे ३०...
कृषी सहायकांची बैठक व्यवस्था योजना...नागपूर ः गावपातळीवर ग्रामविस्ताराला चालना मिळावी...
डिझेल दरवाढीने पीक काढणीचे दर वाढलेअकोलाः गेल्या काही दिवसांत डिझेलचे दर सातत्याने...
‘माफसू’तील प्राध्यापकांना सातवा वेतन...नागपूर : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान...
शेतमाल बाजारपेठेसाठी सरकारचे विशेष...मुंबई : ‘विकेल ते पिकेल’ या अभियानामध्ये पीक,...
गारपीटीने कांदा पातींसह स्वप्नेही तुटली...नाशिक : अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामात अनेक कारणांनी...
उन्हाचा चटका जाणवू लागला पुणे ः मागील चार ते पाच दिवसांपासून थंडीचा प्रभाव...
कापूस खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध सावनेर...‘ऑरेंज सिटी’ अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्हयात...
शेती, पूरक व प्रक्रियेतून आर्थिक सक्षमतापालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यातील...
निरर्थक वादपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेला दोन वर्षे...
अनेक भागांत थंडी कमी पुणे ः राज्यात असलेल्या हवेतील बाष्प कमी झाल्याने...
कोटा अदलाबदल सवलतीचा राज्यातील...कोल्हापूर : साखर कारखान्यांना निर्यातीला...
किसान रेल्वेतून सहा टन शेतीमालाची...नागपूर ः नाशवंत शेतीमालाची कमी वेळात आणि कमी दरात...
हरभरा खरेदीसाठी हेक्टरी उत्पादकता निश्‍...परभणी ः यंदाच्या (२०२०-२१) हंगामात हमीभावाने,...
शेलगाव बाजार ग्रामपंचायत प्रत्येक...बुलडाणा ः गावातून विविध करांपोटी मिळणारा महसूल...
शेतीमाल निर्यात अनुदान योजनेत अस्पष्टता नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडून...
कारवाई दूरच; आता अहवाल फुटल्याची चौकशी पुणे : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
नगदी पिकांच्या जोडीला काकडी, टोमॅटोचे...नागठाणे (ता. जि. सातारा) येथील विक्रम साळुंखे...