agriculture news in Marathi onion is our lakshmi Maharashtra | Agrowon

कांदा हीच आमची लक्ष्मी...

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

बाहेरचा कांदा देशात नको, आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असताना असा अट्टहास कशासाठी? हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, कांदा हीच आमची खरी लक्ष्मी आहे. 

निफाड, जि. नाशिक : बाहेरचा कांदा देशात नको, आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असताना असा अट्टहास कशासाठी? हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, कांदा हीच आमची खरी लक्ष्मी आहे. सरकारला शेतकरीपूरक निर्णय घेण्याची बुद्धी दे, असे साकडे घालत नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक संजय साठे यांनी सपत्नीक कांद्याचीच पूजा करीत लक्ष्मीपूजन केले. 

सध्या देशात कांदा चर्चेचा विषय, पण मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदाच आमची लक्ष्मी. यावरच आमचे कुटुंब अवलंबून आहे, असे सांगत स्वतः पिकविलेल्या कांद्याचेच लक्ष्मीपूजनाला नैताळेचे शेतकरी संजय साठे आणि त्यांच्या पत्नी शोभा साठे या दांपत्याने शनिवारी (ता. १४) पूजन करत केंद्र सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली. 

गेल्या काही वर्षांत सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण ठरत आहे. आधीच तीन वर्षांपासून दुष्काळ आणि अतिवृष्टीचा फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडते आहे. 

गत वर्षीही संजय साठे यांनी आपल्या मातीमोल विकलेल्या कांद्याची पंतप्रधानांना मनीऑर्डर केली होती. शनिवारी पुन्हा शेतकरीवर्गाच्या व्यथा सरकारदरबारी पोहोचाव्यात म्हणून आपल्या कांदाचाळीला सजवून साठे दांपत्याने कांद्यांची विधिवत पूजा करत सरकारला शेतकरीवर्गासाठी पूरक निर्णय घेण्याची बुद्धी दे, बाहेरचा कांदा देशात नको, आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असताना असा अट्टहास कशासाठी? हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, अशी या वेळी मागणी केली.

प्रतिक्रिया
शेतकऱ्यांनी महागडे बियाणे घेत कांद्याचे पीक घेतले. मात्र त्या पिकाला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. जे पीक हातात आले, ते शासनाच्या निर्णयामुळे मातीमोल विकण्याची वेळ आली आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांचा गांभीर्याने विचार करावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही कांद्याचे पूजन केले.
-संजय साठे, कांदा उत्पादक, नैताळे, ता. निफाड


इतर अॅग्रो विशेष
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...
‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...
महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....
रत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...
‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...
मराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...
सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...
राज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...
राज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...