agriculture news in Marathi onion is our lakshmi Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कांदा हीच आमची लक्ष्मी...

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

बाहेरचा कांदा देशात नको, आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असताना असा अट्टहास कशासाठी? हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, कांदा हीच आमची खरी लक्ष्मी आहे. 

निफाड, जि. नाशिक : बाहेरचा कांदा देशात नको, आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असताना असा अट्टहास कशासाठी? हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, कांदा हीच आमची खरी लक्ष्मी आहे. सरकारला शेतकरीपूरक निर्णय घेण्याची बुद्धी दे, असे साकडे घालत नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक संजय साठे यांनी सपत्नीक कांद्याचीच पूजा करीत लक्ष्मीपूजन केले. 

सध्या देशात कांदा चर्चेचा विषय, पण मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदाच आमची लक्ष्मी. यावरच आमचे कुटुंब अवलंबून आहे, असे सांगत स्वतः पिकविलेल्या कांद्याचेच लक्ष्मीपूजनाला नैताळेचे शेतकरी संजय साठे आणि त्यांच्या पत्नी शोभा साठे या दांपत्याने शनिवारी (ता. १४) पूजन करत केंद्र सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली. 

गेल्या काही वर्षांत सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण ठरत आहे. आधीच तीन वर्षांपासून दुष्काळ आणि अतिवृष्टीचा फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडते आहे. 

गत वर्षीही संजय साठे यांनी आपल्या मातीमोल विकलेल्या कांद्याची पंतप्रधानांना मनीऑर्डर केली होती. शनिवारी पुन्हा शेतकरीवर्गाच्या व्यथा सरकारदरबारी पोहोचाव्यात म्हणून आपल्या कांदाचाळीला सजवून साठे दांपत्याने कांद्यांची विधिवत पूजा करत सरकारला शेतकरीवर्गासाठी पूरक निर्णय घेण्याची बुद्धी दे, बाहेरचा कांदा देशात नको, आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असताना असा अट्टहास कशासाठी? हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, अशी या वेळी मागणी केली.

प्रतिक्रिया
शेतकऱ्यांनी महागडे बियाणे घेत कांद्याचे पीक घेतले. मात्र त्या पिकाला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. जे पीक हातात आले, ते शासनाच्या निर्णयामुळे मातीमोल विकण्याची वेळ आली आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांचा गांभीर्याने विचार करावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही कांद्याचे पूजन केले.
-संजय साठे, कांदा उत्पादक, नैताळे, ता. निफाड


इतर अॅग्रो विशेष
‘महाडीबीटी’ भक्कम; माघार नाहीपुणे ः कृषी विभागाच्या योजना ‘ऑनलाइन’ तंत्रज्ञान...
नांदेड : हळदीचे कंद जमिनीत सडलेनांदेड : गोदावरी नदीच्या पुरामुळे बागायती पिकांना...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
‘पंतप्रधान शेतकरी सन्मान’ची जबाबदारी...न्यायडोंगरी, ता. नांदगाव : पंतप्रधान शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासूनमुंबई : राज्यात २०२१-२२ साठी उसाचा गाळप हंगाम १५...
सांगली जिल्हा बॅंकेच्या चौकशीचे आदेशसांगली ः सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात...
धरणे अद्याप तहानलेलीचपुणे : जून, जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ...
कांदा- लसूण शेतीत जरे यांचे देशभर नावबहिरवाडी (ता. जि. नगर) येथील कृषिभूषण...
शास्त्रीय, उत्कृष्ट व्यवस्थापनातून बीटल...सातारा जिल्ह्यातील शेळकेवाडी येथील जितेंद्र शेळके...
‘महाडीबीटी’ प्रकल्प अधांतरीपुणे ः ऑनलाइन कामकाज आणि थेट लाभ हस्तांतर प्रणाली...
राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे राज्यात दोन ते तीन दिवस...
उडदाचे दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : नवीन हंगामातील मूग आणि उडदाची बाजारात आवक...
‘टेंभू’ची १ हजार कोटींची कामे लवकरच...सांगली : दुष्काळी पट्ट्यात शेतीला टेंभू...
‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ मोहिमेला मोठा...नगर : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ऊस...नगर ः राज्यात ऊस लागवडीत महात्मा फुले कृषी...
‘एफआरपी’वरून ऊस पट्ट्यात पुन्हा...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात एक रकमेऐवजी तीन...
निर्यातक्षम बागांची नोंदणी लाखावर...पुणे ः राज्यातील निर्यात वाढविण्यासाठी यंदा एक...
नगदी पिकांना हंगामी पिकांची जोड देते...आपली शेती प्रयोगशील ठेवत मुदखेड (जि. नांदेड)...
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्कात...नवी दिल्ली ः देशात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर...