नाशिक विभागात कांदा लागवड क्षेत्रात घट

देशातील एकूण कांदा उत्पादनात ५० टक्के वाटा महाराष्ट्राचा होता. मात्र इतर राज्यांत कांदा लागवड वाढल्याने त्याची टक्केवारी ३० ते ३५ टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कांदा लागवड कमी झाली असली, तरी देशभरात लागवड झालेली आहे. मध्य भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले आहे. त्यामुळे उत्पादन जास्त होऊ शकते. मात्र कांद्याला चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा आहे. - नानासाहेब पाटील , संचालक, नाफेड, नवी दिल्ली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : यंदा कमी झालेला पाऊस व साठवलेल्या उन्हाळ कांद्याला किफायतशीर दर न मिळाल्याने नाशिक विभागात यंदा उन्हाळ कांदा लागवडीत मोठी घट झाली. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास ९० हजार हेक्टरने कांदा लागवड कमी झाली आहे. त्यामुळे यंदा कांदा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने दिली.

नाशिक, पुणे, औरंगाबाद, नगर या जिल्ह्यांत प्रामुख्याने कांदा उत्पादन होते. राज्यातील एकूण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा वाटा ४० टक्के आहे. जिल्ह्यातून जवळपास ७५ टक्के कांदा निर्यात होते. मात्र पाणीटंचाई व अपेक्षित बाजारभावाचा अभाव यामुळे लागवडीला मोठा फटका बसला.

नाशिक विभागातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात कांदा लागवड घटली आहे. मागील वर्षी (२०१७-१८) मध्ये खरीप, लेट खरीप व रब्बी उन्हाळी कांद्याची हंगाम अखेर ३,९२,७११ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा विभागात ३,०८, १४१ हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत लागवडीत तफावत निर्माण झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ८४,५८० हेक्टरने कांदा लागवड कमी झाली आहे. त्यात पाणीटंचाईमुळे कांदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने बाजारभाव टिकून राहतील, अशी अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त केली आहे.  चालू वर्षी लागवड घटली असली, तरी चांगले उत्पादन येऊ शकते. सध्या नवीन कांद्याला चांगली मागणी असून, निर्यातीला संधी आहे. आखाती देशांसह सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, ब्रिटन, ग्रीस, फ्रान्स या देशात चांगली मागणी आहे. त्यामुळे चांगले भाव टप्प्याटप्प्याने मिळू शकतील, अशी माहिती कांदा निर्यातदार मनोज जैन यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com