Agriculture news in marathi; Onion plantation will be less in Khandesh | Agrowon

खानदेशात कांदा लागवड कमीच राहणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 जून 2019

जळगाव  ः खानदेशात कांदा विपणन व्यवस्थेसंबंधी जळगाव, चाळीसगाव, अडावद (ता.चोपडा) व किनगाव (ता.यावल) येथील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना वाईट अनुभव येत असल्याने आगामी हंगामात लाल कांद्याची लागवड कमी होईल, असे संकेत मिळत आहे. 

जळगाव  ः खानदेशात कांदा विपणन व्यवस्थेसंबंधी जळगाव, चाळीसगाव, अडावद (ता.चोपडा) व किनगाव (ता.यावल) येथील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना वाईट अनुभव येत असल्याने आगामी हंगामात लाल कांद्याची लागवड कमी होईल, असे संकेत मिळत आहे. 

कांद्याचे दर लासलगाव (जि. नाशिक), सोलापूर, राहता (जि. नगर) या भागात १३०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. मध्य प्रदेशातील इंदूर, बडवानी येथील बाजारातील तरही १३०० रुपयांवर पोचले आहेत. असे असताना जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मात्र नफेखोर खरेदीदार व अडतदारांच्या मनमानी कारभारामुळे दर १२०० रुपयांवर पोचले नाहीत. इतर ठिकाणी दर बऱ्यापैकी असतात, मग जळगावातच दर का कमी? असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. बाजार समित्यांमधील विपणन व्यवस्थेवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयासह इतर यंत्रणांचेदेखील लक्ष नाही. तपासणी, चौकशी, दरांची अंमलबजावणी, तोलाईचे वाढीव दर, तागाच्या गोण्यांचे अवाजवी दर या संदर्भात कुठलेही नियंत्रण जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिणामी पुढे कांदा रोपवाटिका व लागवडही कमी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

जळगाव जिल्ह्यात केळी, पपईनंतर कांदा पिकाची लागवड वाढू लागली होती. तापी व गिरणाकाठी कांदा पीक वाढले होते. परंतु मागील वर्षभरात कांदा उत्पादकांना अडतदार व खरेदीदारांच्या मिलिभगतमुळे नुकसानीचा सामना करावा लागला आहे. यामुळे पुढे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी लागवड कमी करतील. यामुळे कांदा बियाणे बाजारातही फारशी उलाढाल होणार नाही, असे सांगण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
रताळे वनस्पती गंधाद्वारे देते अन्य...एखाद्या हल्ल्याची चाहूल लागल्यास बहुतांश सजीव...
शेतमाल तारण योजनेअंतर्गत कारंजा बाजार...कारंजालाड, जि. वाशीम  ः शेतकऱ्यांचा शेतमाल...
खानदेशात कापूस दर स्थिर; खेडा खरेदीला...जळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
अधिक ओलावा असलेल्या कापसासाठी हवी...वर्धा ः कापसात ओलावा असल्यामुळे प्रक्रिया उद्योजक...
मराठवाड्यात पाच मोठे प्रकल्प तुडुंब औरंगाबाद : मराठवाड्यातील ११ पैकी पाच मोठे...
शेतमालाच्या शिवार खरेदीवर लक्ष द्या :...जळगाव  ः खानदेशात कापसापाठोपाठ केळी, कांदा व...
सोलापुरात चारा छावण्यांवर २४५ कोटी...सोलापूर ः दुष्काळामध्ये जिल्ह्यात चारा छावण्यांवर...
नाशिक : पणन मंडळाच्या केंद्रातून दुबईला...नाशिक : कसमादे पट्ट्यात सटाणा, कळवण, मालेगाव...
परभणी जिल्ह्यात ज्वारीची ८७ हजार...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार...
कांदा व्यापाऱ्यांच्या साठा तपासणीची...नाशिक  : कांदा दराने मोठी उसळी घेतल्याने व...
सोलापूर जिल्ह्यात मदतीचे अनुदान...सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात...
सांगली : पूरग्रस्तांसाठी १०२ कोटी...सांगली : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये...
पुणे विभागात रब्बीचा साडेसात लाख...पुणे  ः चार ते पाच दिवसांपूर्वी अनेक भागांत...
शिरुरमधील साडेसहा हजारांवर शेतकरी...पुणे  ः यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि...
सरकारच्या निर्णयाचा जिल्हा परिषदेला...नगर  ः राज्य सरकारने मागील सरकारच्या काळात...
नगर जिल्ह्यात पाऊण लाख हेक्टरवर रब्बी...नगर  ः जिल्ह्यात रब्बीत आतापर्यंत सुमारे ७५...
हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या :...औरंगाबाद  : राज्यातील गावा-गावांतील रस्ते,...
राष्ट्रवादी गुरुवारी साजरा करणार...मुंबई  ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
राज्यातील पंचायत समिती सभापतींच्या...पुणे  : राज्यातील पंचायत समित्यांचे नवे...
सोलापुरात कांद्याच्या दरातील तेजी...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...