Agriculture news in Marathi Onion, potato prices improve, vegetable prices stabilize | Agrowon

कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा, भाजीपाला दर स्थिर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

सध्या पितृपंधरवडा सुरू असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढल्याने आणि कांद्याला दक्षिण भारतातून मागणी वाढल्या बरोबरच काद्यांच्या एकूण आवकेतील ५० टक्के कांदा हा भिजलेला असल्याने चांगल्या कांद्यासह, बटाटा, टोमॅटो, हिरवी मिरची, सिमलाच्या दरात १० ते २० टक्के वाढ झाली होती. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १३) भाजीपाल्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत घट झाली होती. सध्या पितृपंधरवडा सुरू असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढल्याने आणि कांद्याला दक्षिण भारतातून मागणी वाढल्या बरोबरच काद्यांच्या एकूण आवकेतील ५० टक्के कांदा हा भिजलेला असल्याने चांगल्या कांद्यासह, बटाटा, टोमॅटो, हिरवी मिरची, सिमलाच्या दरात १० ते २० टक्के वाढ झाली होती. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.

आवकेमध्ये परराज्यातून इंदौर येथून ८ टेम्पो गाजर, कर्नाटक गुजरात येथून ३ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात येथून १० टेम्पो हिरवी मिरची, तामिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, तर आग्रा आणि इंदौर येथून ४० ट्रक बटाटा तर गुजरात आणि मध्यप्रदेशातून लसूण ८ ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, कोबी सुमारे ८ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, भेंडी ८, गवार ५, सिमला मिरची १० टेम्पो हिरवी मिरची ३ टेम्पो, घेवडा ४ टेम्पो, टोमॅटो दीड हजार क्रेट आवक झाली होती. तर भुईमूग सुमारे १५० गोणी, पारनेर पुरंदर येथून मटार २५० गोणी, तांबडा भोपळा ८ टेम्पो, कांदा सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सुमारे दीड लाख हजार तर मेथीच्या ४० हजार जुड्या आवक झाली होती.

फळभाज्यांचे १० किलोचे दर पुढीलप्रमाणे
कांदा - २००-२५०, भिजलेला १००-१५०, बटाटा -२५०-३००, लसूण - ५५०-११००, आले सातारी २५०-३५०, भेंडी १५०-२००, गवार - गावरान, सुरती - ३००-४००, टोमॅटो -२५०-३५०, दोडका २५०-३२०, हिरवी मिरची - ३००-३५०, दुधी भोपळा - १५०-२००, चवळी -२००-२२०, काकडी -१५०-२००, कारली हिरवी - ३००-३५०, पांढरी -२००-२२०, पापडी - ३००-३५०, पडवळ -१८०-२००, फ्लॉवर १५०-२००, कोबी -८०-१४०, वांगी -१५०-२००, डिंगरी - २००-२२०, नवलकोल - ८०-१००, ढोबळी मिरची - ३००-३५०, तोंडली- कळी २००-२२०, जाड -९०-१००, शेवगा -५००-७००, गाजर - १४०-१८०, वालवर - २५०-३००, बीट ८०-१००, घेवडा -३००-४००, कोहळा १००-१२०, आर्वी -१८०-२००, घोसावळे १५०-१८०, मटार स्थानिक - ८००- १०००, पावटा २५०-३००, तांबडा भोपळा - ६०-१००, सुरण -१८०-२००, नारळ (शेकडा) १०००-१६००, मका कणीस (१० किलो) ६०-१००

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर
कोथिंबीर - ३००-१२००, मेथी १४००-१८००, शेपू ४००-८०० कांदापात ८००-१२००, चाकवत ५००-८००, करडई -५००-६००, पुदिना - ३००-६००, अंबाडी -५००-८००, मुळे १५००-२५००, राजगिरा - ८००-१०००, चुका ८००-१०००, चवळई -८००-१२००, पालक ८००-१२००

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१०, गुलछडी : १०-३०, सुट्टा कागडा - ४०-६०, कापरी : १०-२०, शेवंती : २०-४० (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१०, गुलछडी काडी : ५-१०, डच गुलाब (२० नग) : १०-३०, लिलि बंडल : १०-१२ जर्बेरा : ५-१० ,

फळांचा बाजार
रविवारी (ता. १३) येथील फळबाजारात संत्री ८ टन तर मोसंबी सुमारे ८० टन, डाळिंब सुमारे १५० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे २ हजार गोणी, कलिंगड १० टेम्पो, खरबूज ३ टेम्पो, सीताफळ ६ टन, चिकू ६०० बॉक्स आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २००-३००, मोसंबी : (३ डझन) : १००-२३०, (४ डझन ) : २५-१२०, संत्रा : (३ डझन) : १००-२०० (४ डझन) - ३०-१००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१००, गणेश : १०-५० आरक्ता २५-६०. कलिंगड : १०-२०, खरबूज : १०-३०, पपई : ५-२०, सीताफळ - १०-१४०.

मटण मासळी
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १३) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १२ टन, खाडीची सुमारे ५०० किलो तर नदीच्या मासळीची ७०० किलो आवक झाली होती. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १२ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

दरम्यान चिकन, मटण आणि मासळीला मागणी वाढली आहे. मासळीची आवक वाढली असून मागणीही चांगली आहे. त्यामुळे सर्व मासळीच्या दरात १० ते २० टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिकनचे दर टिकून आहेत. तर इंग्लिश अंड्याच्या शेकड्याच्या दरात ५० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे. गावरान अंडी आणि मटणाचे दर स्थिर आहेत.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :
पापलेट : कापरी : १३००, मोठे १०००, मध्यम : ५५०-७५०, लहान ४४०- ४८०, भिला : ३२०-३६०, हलवा : ४४०-४८०, सुरमई : ४८०-५५०, रावस : लहान ५५०, मोठा : ८००, घोळ : ५५०, भिंग : ३२०, करली : २४०-२८०, करंदी : १४०-१६०, सोललेली ४००, पाला : ११००-१२००, वाम : ४८०, मोठी ५५०, ओले बोंबील : १२०.

कोळंबी ः लहान २८०, मध्यम ४००, मोठे ४८०, जंबोप्रॉन्स : १०००, किंगप्रॉन्स : ५५०, लॉबस्टर : १०००, मोरी : ३६०, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : १६०, खेकडे : १८०-२००, चिंबोऱ्या : ४८०.

खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी : २००-२४०, नगली : ४००, तांबोशी :४००- ४८०, पालू : २८०, लेपा : २००, शेवटे : २००, बांगडा : लहान २००, मोठे ३३०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : २८०, खुबे : १४०, तारली : १६०

नदीची मासळी : रहू : १६०, कतला : २००, मरळ : ४८० शिवडा : २८०, खवली : २८०, आम्ळी : १६०, खेकडे : २०० वाम : ५५०

चिकन : १८०, लेगपीस : २२० जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २८०.

अंडी : गावरान : शेकडा : ६६० डझन : ९० प्रति नग : ७.५, इंग्लिश : शेकडा : ५८० डझन : ७२ प्रतिनग : ६.

मटण : बोकडाचे : ६४० बोल्हाईचे : ६४० खिमा : ६४०, कलेजी : ६४०.


इतर बाजारभाव बातम्या
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात वांगी सरासरी १५०० ते ८००० रूपयेनाशिकमध्ये ३००० ते ५५०० रुपये नाशिक : येथील...
नाशिकमध्ये वांग्यांना ५५०० सरासरी रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात मुगाला सरासरी ५९०० रुपये दरअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात टोमॅटो, ढोबळी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्यांच्या दरात सुधारणा,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा नगरः जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे मागील...
पुण्यात हिरवी मिरची, फ्लॉवरच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये मुगाला सरासरी ५५००, उडदाला...नगर : बाजारात मुगाची व उडदाची मोठ्या प्रमाणात आवक...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरचीला सरासरी ५५००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मुंबई बाजार समितीत कांद्याच्या दरात...मुंबई : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी...
परभणीत भुईमूग शेंगा सरासरी ४२५० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात डाळिंबांना ३०० ते १२००० रूपये दरनाशिकमध्ये ३०० ते १२००० रुपये नाशिक : येथील...