खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा

जळगावः खानदेशात कांद्याची कमी असलेली लागवड व प्रतिकूल वातावरणामुळे रखडलेली काढणी यामुळे बाजारात या आठवड्यात कांद्याची आवक २० ते २५ टक्के घटली आहे.
Onion price improvement in Khandesh
Onion price improvement in Khandesh

जळगाव ः खानदेशात कांद्याची कमी असलेली लागवड व प्रतिकूल वातावरणामुळे रखडलेली काढणी यामुळे बाजारात या आठवड्यात कांद्याची आवक २० ते २५ टक्के घटली आहे. जळगाव, धुळे, साक्री (जि.धुळे), चाळीसगाव (जि.जळगाव) येथील बाजारात आवक कमी झाल्याने दरात सुधारणा झाली आहे. 

कांद्याचे कमाल दर गेल्या आठ दिवसांपूर्वी ३१०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. त्यात या आठवड्यात क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांनी सुधारणा झाली आहे. लाल कांद्याचीच आवक बाजारात होत आहे. जळगाव येथील बाजारात या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ३६५ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे.

धुळ्यातही प्रतिदिन सरासरी ६०० क्विंटल आवक झाली. तर चाळीसगाव येथेही आवक प्रतिदिन सरासरी ४०० क्विंटल राहीली आहे. जळगाव येथे जालना, औरंगाबाग, जळगावमधील भुसावळ, चोपडा, जळगाव, जामनेर या भागातून आवक होत आहे.

धुळे येथे जळगावमधील पारोळा, धुळे, शिरपूर भागातून कांद्याची आवक सुरू आहे. तर चाळीसगाव येथे जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, नाशिकमधील नांदगाव, मनमाड भागातूनही लाल कांद्याची आवक होत आहे. कांद्याची आवक कमी असतानाच उठाव कायम आहे. हॉटेल्ससह बिजोत्पादनासाठी कांद्याची खरेदी बाजारात लागलीच केली जात आहे. कांद्याला उठाव असल्याने दर टिकून आहेत. 

आवक वाढण्याचा अंदाज

गेल्या वर्षापेक्षा यंदा कांद्याचे दर मात्र कमी आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये कांद्याला सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले होते. अनेक शेतकऱ्यांना दर्जेदार लाल कांद्यास थेट जागेवर ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. कांद्याची आवक सध्या कमी असली तरी पुढे आवक वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com