agriculture news in marathi Onion price improvement in Khandesh | Agrowon

खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 जानेवारी 2021

जळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर गेल्या आठवड्यात क्विंटलमागे १५० रुपयांनी वधारून ८५० ते २४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले.

जळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर गेल्या आठवड्यात क्विंटलमागे १५० रुपयांनी वधारून ८५० ते २४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले.
गेल्या महिन्याच्या मध्यात दर ६०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते.

निर्यातबंदी दूर झाल्यानंतर दरात सुधारणा होत आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, अडावद (ता.चोपडा), किनगाव (ता.यावल), चाळीसगाव, धुळ्यात पिंपळनेर (ता.साक्री), साक्री, धुळे येथील बाजार कांद्यासाठी प्रसिद्ध आहेत. या सर्वच बाजारात कांद्याची आवक मात्र महिनाभरापासून सतत कमी होत आहे. 

गेल्या महिन्याच्या सुरवातीला जळगाव येथील बाजारात ८०० ते ९०० क्विंटल लाल कांद्याची आवक सुरू होती. परंतु नंतर आवक कमी होत गेली. सध्या आवक ४५० क्विंटल, अशी आहे. धुळे येथेही गेल्या महिन्याच्या सुरवातीला प्रतिदिन सरासरी १००० क्विंटल लाल कांद्याची आवक सुरू होती. परंतु या महिन्यात तेथेही ६०० ते ६५० क्विंटल, अशी आवक होत आहे. आवक कमी झाल्याने कांदा दरातील सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांना फारसा होत नसल्याची स्थिती आहे. 

कांद्याची कमाल आवक नोव्हेंबरअखेरिस झाली. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात दरात मोठी पडझड झाली. यानंतर आवक कमी होण्यास सुरवात झाली. सध्या आवक रखडत सुरू आहे. पुढे आवक आणखी कमी होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कारण घरात अधिक वेळ कांद्याची साठवणूक करता येत नाही. 

आवक कमी

काढणीनंतर शेतातच अनेकांनी सात ते आठ दिवस कांद्याची साठवणूक दरांच्या अपेक्षेने केली. परंतु दरांची फारशी वाढ दिसत नसल्याने कांद्याचा पुरवठा बाजारात वाढला. कांद्याची आवक चाळीसगाव, अडावद येथील बाजारातही कमी असल्याची माहिती मिळाली.

टॅग्स

इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
नाशिकमध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात घेवडा, भेंडी, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये तुरीला क्विंटलला सव्वा सहा... नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात भाजीपाल्याचे दर स्थिर पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगलीत बेदाण्याला उच्चांकी २७१ रुपये दरसांगली ः होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा...
खानदेशात कांदा दर स्थिरजळगाव ः खानदेशात मागील महिनाभरापासून कांदा दर...
औरंगाबादमध्ये द्राक्षांना क्विंटलला...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात हरभरा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात हरभरा दरात सुधारणा झाली असून, दर...
राज्यात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटललातुरात प्रतिक्विंटलला ७००० ते १२५०० रुपये...
खानदेशात केळी कमाल १०००, तर किमान दर...जळगाव : खानदेशात केळीची आवक कमी आहे. दुसरीकडे...
सोलापुरात हिरवी मिरची दरात सुधारणासोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये लाल कांदा दरात सुधारणा कायमनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
वाईत नवीन हळदीची आवक सुरू वाई, जि. सातारा ः येथील शेती उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत रविवारी (ता. १४)...
पुण्यात भेंडी, टोमॅटोच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात द्राक्ष २५०० ते १५००० रुपयेजळगावात क्विंटलला ५००० ते ८००० रुपये जळगाव ः...